माकडासोबत करत होता 'मजाक'; त्यानं खरोखरच डोक्यात 'तलवार' घातली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 17:23 IST2021-10-18T17:21:29+5:302021-10-18T17:23:10+5:30
या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये एका माकडच्या हातात 'लाकडी तलवार' दिसत आहे. त्याच्या शेजारी एक व्यक्ती बसलेली आहे. ती व्यक्ती माकडाचा हात धरून त्याला डोक्यावर वार करण्याचे प्रशिक्षण देत आहे.

माकडासोबत करत होता 'मजाक'; त्यानं खरोखरच डोक्यात 'तलवार' घातली!
प्राण्यांचे प्रशिक्षण अत्यंत कठीण असते. प्राण्यांनी माणसांचे मनोरंजन करावे आणि आदेशांचे पालन करावे, असा या प्रशिक्षणामागचा हेतू असतो. पण, कधी-कधी प्रशिक्षणादरम्यान प्राणी प्रशिक्षकावरच आपला राग व्यक्त करतात! तो कसा? हे आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही क्लिप पाहून कळेलच. खरे तर, हा व्हिडिओ केवळ 4 सेकंदांचाच आहे. पण, तो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू अवरणार नाही. एवढेच नाही, तर हा व्हिडिओ आपण वारंवारही बघू शकता.
माकडानं एका दमात काढली संपूर्ण भडास -
या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये एका माकडच्या हातात 'लाकडी तलवार' दिसत आहे. त्याच्या शेजारी एक व्यक्ती बसलेली आहे. ती व्यक्ती माकडाचा हात धरून त्याला डोक्यावर वार करण्याचे प्रशिक्षण देत आहे. ती व्यक्ती सुमारे तीन ते चार वेळा त्या माकडाकडून हा सराव करून घेताना दिसते. पण शेवटी, माकड चिडून त्या व्यक्तीच्या डोक्यात जोरात वार करतो.
I can’t stop laughing... pic.twitter.com/1XbtXNcUZl
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) October 17, 2021
हा व्हिडिओ ट्विटर यूझर @RexChapman ने शेअर करत लिहिले आहे, की मला माझे हसू अवरणे अशक्य होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला असून हजारो लोकांनी लाइक आणि शेअर केला आहे.