राज्यातील कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला होता. परंतु आता यातून महाराष्ट्र सावरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढणारी रूग्णसंख्याही आता कमी होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को कोविड सेंटरला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. दरम्यान, नेस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमादकम्यान आरोग्य कर्मचारी झिगाट या गाण्यावर थिरकताना दिसले. मुंबईतील नेस्को कोविड सेंटर सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. दरम्यान,२ जून रोजी नेस्को कोविड सेंटरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी झिंगाट या गाण्यावर थिरकताना दिसले.
Video : मुंबईतील नेस्को कोविड केंद्राच्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा 'झिंगाट' डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 23:17 IST
नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरला हा व्हिडीओ. नेटकऱ्यांनीही मानले दिवसरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार.
Video : मुंबईतील नेस्को कोविड केंद्राच्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा 'झिंगाट' डान्स
ठळक मुद्देनेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरला हा व्हिडीओ.नेटकऱ्यांनीही मानले दिवसरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार.