Video: या महिलेने तोडले पाणीपुरी खाण्याचे सर्व विक्रम! 20 लाख जणांनी पाहिलाय हा व्हिडीओ

By सागर सिरसाट | Updated: September 22, 2017 16:40 IST2017-09-22T16:37:49+5:302017-09-22T16:40:51+5:30

पाणीपुरी न खाल्लेली व्यक्ती कदाचित शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. एका महिलेने तर पाणीपुरी खाण्याची परिभाषाच बदलून टाकली आहे. ही महिला ज्या पद्धतीने पाणीपुरी खातेय त्या प्रकारे पाणीपुरी खाण्याचा साधा विचारही तुम्ही कधी केला नसेल. 

Video: This woman broke all records of drinking water! The video is viewed by 20 million people | Video: या महिलेने तोडले पाणीपुरी खाण्याचे सर्व विक्रम! 20 लाख जणांनी पाहिलाय हा व्हिडीओ

Video: या महिलेने तोडले पाणीपुरी खाण्याचे सर्व विक्रम! 20 लाख जणांनी पाहिलाय हा व्हिडीओ

मुंबई - पाणीपुरी न खाल्लेली व्यक्ती कदाचित शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. एका महिलेने तर पाणीपुरी खाण्याची परिभाषाच बदलून टाकली आहे. ही महिला ज्या पद्धतीने पाणीपुरी खातेय त्या प्रकारे पाणीपुरी खाण्याचा साधा विचारही तुम्ही कधी केला नसेल. 

सोशल मीडियावर अत्यंत विचित्र पद्धतीने पाणीपुरी खाणा-या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत जवळपास 20 लाखांहून जास्त जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ही महिला पाणीपुरीचा अक्षरशः चुरा करते आणि तो चुरा मसाल्यासोबत मिक्स करून ती खाताना दिसतेय. तर पाणीपुरीसोबतचं पाणी ती दुस-या ग्लासमधून पिते.  

पाणीपुरी संपताच ती धावत जावून आणखी पाणीपुरी घेवून येते. हा व्हिडीओ एका फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. तीन मिनिटांचा हा व्हिडीओ पाणीपुरी खाण्याच्या स्पर्धेतील असल्याचं दिसतं. पाहायला कितीही विचित्र वाटत असला तरी आतापर्यंत 18 हजार जणांनी हा व्हिडीओ आपल्या टाइमलाइनवर शेअर केला आहे.  

पाहा व्हिडीओ - 

 

Web Title: Video: This woman broke all records of drinking water! The video is viewed by 20 million people