शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

VIDEO : बाइक चोरी करून पेट्रोल पंपावर आला चोर, मागून कारने बाइकचा मालक आला आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 10:39 IST

बऱ्याच घटनांमध्ये तर असंही होतं की, स्वत: वाहन मालक चोरांना पकडतात आणि त्यांना चोप देतात. केरळमधील अशीच एक घटना समोर आली आहे.

Petrol Pump Video: जगभरातून चोरीच्या वेगवेगळ्या अजब घटना समोर येत असतात. दररोज वाहन चोरीच्या घटना घडत असतात. बऱ्याचदा तर चोरी झालेली दुचाकी परतही मिळत नाही. पण कधी कधी वाहन चोरी करणाऱ्या गॅंगचा भांडाफोड होतो आणि ते पकडले जातात. पण सध्या एका अशा चोरीचा व्हिडीओ व्हायरल झालाय जो बघून तुम्ही हैराण व्हाल.

बऱ्याच घटनांमध्ये तर असंही होतं की, स्वत: वाहन मालक चोरांना पकडतात आणि त्यांना चोप देतात. केरळमधील अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एक चोर बाइक चोरी करतो आणि  पेट्रोल पंपावर जातो. इथे बाइकचा मालक येतो आणि आपली बाइक परत मिळवतो. या पूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, कोझिकोड जिल्ह्याच्या कदलुंडी गावातील पंचायत सदस्य प्रवीण यांनी बाइक गेल्या शनिवारी चोरी झाली होती. दुसऱ्या दिवशी याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली. पण पोलिसांनी बाइकची ओरिजनल कागदपत्रे जमा करण्यास सांगितली. प्रवीण आणि त्यांचे काही मित्र कागदपत्रे आणण्यासाठी त्यांच्या घरी गेले. व्हिडीओत एक कार दिसत आहे. असं सांगण्यात आलं की, प्रवीण यांचे मित्र डीझेल भरण्यासाठी पंपावर येत होते, तेव्हाच त्यांना प्रवीण यांची चोरी झालेली बाइक दिसली.

जशी त्यांनी पेट्रोल पंपवर एंट्री घेतली त्यांनी एका बाइकला ओव्हरटेक केलं. प्रवीण यांनी पाहिलं तर बाइक त्यांचीच होती. या बाइकवर दोन व्यक्ती बसले होते. त्यांना पकडण्यासाठी प्रवीण आणि त्यांचे मित्र तयार झाले. त्यांनी बाइक धरली आणि इतक्यात हेल्मेट घालून असलेली व्यक्ती पळून गेली. तर बाइकवर मागे बसलेली व्यक्ती पकडली गेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेThiefचोर