शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

#VIDEO : हॉस्पिटलमध्ये खितपत पडलेल्या आजोबांना बरं वाटावं म्हणून कुटूंब नाचलं भांगड्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 14:40 IST

आपल्या कुटूंबाला असं एकत्र पाहून त्या आजोबांच्या चेहऱ्यावरील हास्यही तितकंच आश्वासक वाटतंय.

ठळक मुद्देआजारी व्यक्तींना औषधांसोबत काही मायेच्या, आपुलकीच्या आणि चांगल्या शब्दांचीही गरज असते.आपल्या कुटूंबातल्या या जेष्ठ व्यक्तीला आजारपणात थोडं बरं वाटावं म्हणून हे कुटूंब काही प्रयत्न करताना दिसतंय.ते सगळे एकत्र भांगडा करत आहेत. त्यात तरुणासह काही स्त्रियासुध्दा नाचताना दिसताहेत.

मुंबई : महागड्या औषधांनीही जेव्हा आजार बरा होत नाही तेव्हा कुटूंबाचं एकत्र असणं आणि हसणं आजारी माणसाला बळ देतं. असंच काही सांगणारा हा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रुग्णालयात बेडवर खितपत पडलेल्या आजोबांना बरं वाटावं याकरता त्यांच्या नातेवाईंकांनी चक्क भांगडा नृत्य केलं आहे.

इतर सोशल व्हायरल बातम्यांसाठी येथे क्लिक करा

नववर्षादरम्यान हा व्हिडीयो बनवण्यात करण्यात आला आहे. त्या शुभेच्छांच्या संदेशासोबतच तो आपल्याला पाहायला मिळतो. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, एक वयोवृद्ध आजोबा बेडवर पडून आहेत. त्यांना आनंद वाटावा, त्यांनी थोडंसं हसावं याकरता त्यांच्या कुटूंबियांनी रुग्णालयातच भांगडा नृत्य केलं आहे. हॉस्पिटलमध्ये खितपत पडलेल्या रुग्णांना बरं वाटण्याकरता त्यांनी आतून आनंदी असणं गरजेचं आहे. महागडी औषधं आणि महागडी उपचारांमुळे सकारात्मका येत नाही तर आपल्या कुटूंबातील व्यक्तींच्या सहकार्यामुळे, पाठिंब्यामुळे आणि हास्यामुळेच रुग्णांना सकारात्मक वाटत असतं. हीच गोष्ट लक्षात घेऊन एका कुटूंबाने आपल्या घरातल्या त्या जेष्ठ व्यक्तीसाठी भांगडा नृत्य केलं आहे.  पाहा व्हिडीओ - 

आणखी वाचा - दोन तोंड, दोन नाक आणि तीन डोळे असलेली ही मांजर इंटरनेटवर होतेय व्हायरल

या व्हिडिओत दोन तरुणांसोबतच दोन वृद्ध महिलाही नाचताना दिसतात. आपलं वय विसरून आपल्या आजारी माणसाला आनंदी पाहण्यासाठी अगदी जल्लोषात ते भांगडा सादर करतात. आजीबाईंचा ठुमकाही पाहण्यासारखा आहे. ए‌वढंच नव्हे तर आजीबाई आजोबांनाही नाचण्याचा आग्रह करताना दिसताएत. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कोणाचा आहे? या व्हिडिओमध्ये दिसणारं कुटूंब कोणतं आहे? याबाबतची माहिती अद्यापही कळू शकलेली नाही. मात्र फेसबूकवर अनेक पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल झालाय. नेटिझन्सने या व्हिडिओ चांगलाच डोक्यावर घेतलाय. आतापर्यंत या व्हिडिओला फेसबूकवर ८० हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.

आणखी वाचा - #SocialViral : बर्फाने गोठलेल्या नदीत स्केटिंग करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInternetइंटरनेट