ठळक मुद्देसोशल मीडियावर केवळ माणसंच प्रसिद्ध होऊ शकतात असं काही नाही. गेल्या काही दिवसात आपण पाहिलंय की कुत्र्या-मांजरांचेही सोशल मीडिया अकाऊंट बनवले गेलेत.दोन तोंड, ती डोळे, दोन नाक असलेल्या मांजरीचं हे अकाऊंट सध्या फेसबूकवर प्रचंड व्हायरल आहे.

साऊथ अफ्रिका : सोशल मीडियावर केवळ माणसंच प्रसिद्ध होऊ शकतात असं काही नाही. गेल्या काही दिवसात आपण पाहिलंय की कुत्र्या-मांजरांचेही सोशल मीडिया अकाऊंट बनवले गेलेत. त्यांच्या पेजलाही भरपूर लाईक्स आणि शेअरही मिळताहेत. असंच एक फसबूक अकाऊंट सध्या चर्चेत आहे. हे अकाऊंट आहे दोन तोंड, ती डोळे, दोन नाक असलेल्या मांजरीचं. फक्त ११ दिवसांची असलेली ही मांजर सध्या फेसबूकवर प्रचंड व्हायरल झाली असून ती लवकरात लवकर बरी व्हावी अशीच सगळ्यांनी प्रार्थना केलीय.

डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, ही मांजर आहे मुळची साऊथ अफ्रिकामधील. बेट्टी बी असं तिचं नाव आहे. २३ डिसेंबर २०१७ साली तिचा जन्म झाला. तिचा जन्म झाला तेव्हा आणखी दोन पिल्लांचाही जन्म झाला. पण बेट्टी बी त्यांच्यात वेगळी ठरली. कारण ती इतर प्राण्यांपेक्षा फार वेगळी आहे. तिला दोन तोंड, दोन नाक आणि तीन डोळे आहेत. असं फार क्वचित घडतं. आणि जेव्हा जेव्हा प्राणी असे जन्माला येतात तेव्हा ते फार काळ जीवंत राहू शकत नाहीत. मात्र या मांजरीच्या मालकाने तिला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.

तिला दोन तोंड असल्याने ती व्यवस्थित खाऊ शकत नाही. मात्र तिचा मालक तिला अत्यंत जिकरीनं जेवण भरवतो. या मांजरीला ट्यूबच्या माध्यमातून जेवण भरवावं लागतं. तिच्या मालकाने सांगितल्याप्रमाणे भरवलेलं दूध तिच्या पोटापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे तिला जगण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतोय. दूध प्यायल्यास ती लगेच उल्टीही करते. एवढंच नव्हे तर तिला तीन डोळे असले तरीही दोन डोळे अद्यापही बंद आहेत. पण मालकानेही चंग बांधलाय की शक्य होईल तितके सगळे प्रयत्न करून या मांजरीला जीवनदान द्यायचं.

या मांजरीचं फेसबूकवर अकाऊंटही आहे. अल्पावधीतच ती इंटरनेटवर प्रसिद्ध झाली. तिच्या फोटोला हजारोंनी लाईक्स मिळतात. ती लवकरात लवकर बरी व्हावी याकरता साऱ्याच नेटीझन्सने प्रार्थन केलेली आहे. तिचे व्हिडिओ आणि फोटोज तिचे फॉलोव्हर्स न चुकता पाहतात.