शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

भाजी विकणारा केवळ 6 महिन्यात बनला 21 कोटींचा मालक, कहाणी वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 09:58 IST

पोलिसांनी त्याला 28 ऑक्टोबरला अटक केली. कारण त्याने अशा बॅंक खात्यांचा वापर केला होता, ज्यांचा वापर त्याने पैसे नेण्यासाठी केला.

Crorepati Vegetable Seller: ऋषभ शर्मा नावाच्या व्यक्तीने पोट भरण्यासाठी भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पण जेव्हा महामारी आली तेव्हा त्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं. अशात त्याने घरून काम करण्याच्या एका फेक स्कीमसाठी काम सुरू केलं आणि सगळं काही बदललं. मीडिया रिपोर्टनुसार, केवळ सहा महिन्यात ऋषभने लोकांचे 21 कोटी रूपये लुटले. तो 10 राज्य आणि 37 फसवणुकीच्या केसेसमध्ये एक वॉन्टेड व्यक्ती बनला आणि 855 इतर घोटाळेही केले. पोलिसांनी त्याला 28 ऑक्टोबरला अटक केली. कारण त्याने अशा बॅंक खात्यांचा वापर केला होता, ज्यांचा वापर त्याने पैसे नेण्यासाठी केला.

भाजीवाला कसा बनला फ्रॉड

रिपोर्टनुसार, आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे तो सीक्रेट मेथडचा वापर करून चीन आणि सिंगापूरसारख्या इतर देशांतील गुन्हेगारी समूहांसोबत काम करत होता. त्याची ही पूर्ण कहाणी वाचून तुम्हीही हैराण व्हाल. काही वर्षाआधी ऋषभचं फरीदाबादमध्ये एक छोटसं भाजीचं दुकान होतं. पण महामारीत त्याला आपलं दुकान बंद करावं लागलं. आपल्या परिवाराची मदत करण्यासाठी त्याने घरून वेगवेगळी कामे करण्याचा प्रयत्न केला. अशात त्याची त्याच्या एका जुन्या मित्रासोबत भेट झाली. जो आधीच ऑनलाईन स्कॅममध्ये सहभागी होता.त्या मित्राने ऋषभला फोन नंबरांची एक यादी दिली आणि त्याने त्यांचा वापर कामाची गरज असलेल्या लोकांना कॉल करण्यासाठी केला. ऋषभ त्यांना फेक जॉब ऑफर देत होता. त्याची शेवटची शिकार देहरादूनमधील एक बिझनेसमन होता. ज्याचं 20 लाख रूपयांचं नुकसान झालं होतं. ऋषभने एक फेक वेबसाइट बनवली होती ज मॅरिएट बॉनवॉय हॉटेलच्या वेबसाइटसारखी दिसत होती. त्याने हॉटेल ग्रुपसाठी रिव्ह्यूज लिहिण्यासाठी पार्ट-टाइम नोकरीची ऑफर दिली. त्याने तो या हॉटेलमधील असल्याचं सांगितलं. 

फेक वेबसाइटद्वारे लोकांना लुटलं

त्याने पीडितांसाठी एक फेक टेलीग्राम ग्रुपही तयार केला. त्याने त्यांना हॉटेलसाठी पॉझिटिव्ह रिव्ह्यूज लिहिण्यास आणि फेक गेस्टच्या प्रश्नांना उत्तर देण्यास सांगितलं. ऋषभने आधी या लोकांना 10 हजार रूपये देऊन त्यांचा विश्वास मिळवला. नंतर त्याने त्यांना मोठी इनव्हेस्टमेंट करून मोठ्या रिटर्नचं आश्वासन दिलं. पण जेव्हा सगळ्या लोकांनी मोठा पैसा इव्हेस्ट केला तेव्हा तो ते घेऊन गायब झाला. 

पोलिसांनी  ऋषभवर फसवणूक आणि इतर गुन्ह्यांचा आरोप केला. त्यांना आढळलं की, हा घोटाळा इतर देशांच्या गुन्हेगार समूहांशी जुळलेला आहे. हे समूह चोरी केलेलं धन दुसऱ्या देशांमध्ये सीक्रेट पद्धतीने पाठवण्याआधी त्यासाठी बॅंक खातं उघडण्यासाठी भारतातील लोकांची निवड करतात.

ऋषभच्या अटकेनंतर पोलिसांना समजलं की, ही समस्या किती मोठी आहे. त्यांना आढळलं की, तो 10 राज्यांमध्ये अनेक केसेसमध्ये सहभागी होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी