थरारक व्हिडीओ! बंदुक घेऊन स्टोरमध्ये शिरले दोन चोर, ग्राहकाने ८ सेकंदात पळवून लावले.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 17:39 IST2021-10-23T17:35:25+5:302021-10-23T17:39:00+5:30
ही घटना अमेरिकेच्या यूमा, एरीजोनाची आहे. जसे दोन मास्क घातलेले चोर बंदूक हातात घेऊन गॅस स्टेशनच्या आत शिरले. त्यातील एकाने कॅशिअरवर बंदूक ताणली.

थरारक व्हिडीओ! बंदुक घेऊन स्टोरमध्ये शिरले दोन चोर, ग्राहकाने ८ सेकंदात पळवून लावले.....
अमेरिकेतील एक खतरनाक व्हिडीओ समोर आला आहे. यात दोन चोर हातात बंदूक घेऊन एका गॅस स्टेशनमध्ये शिरतात. समोर एक यूएस मरीन उभा असतो, ते चोर आत येताच यूएस मरीन अचानक अॅक्शन घेतो आणि चोराला खाली पाडतो. त्यातील एक चोर घाबरून लगेच उलट्या पावलाने बाहेर पळून जातो.
ही घटना अमेरिकेच्या यूमा, एरीजोनाची आहे. जसे दोन मास्क घातलेले चोर बंदूक हातात घेऊन गॅस स्टेशनच्या आत शिरले. त्यातील एकाने कॅशिअरवर बंदूक ताणली. तेच बाजूला एक ग्राहक उभा होता. तो बाहेर जाणारच होता. तो यूएस मरीनमध्ये काम करतो. त्याने लगेच चपळाई दाखवत चोराकडून बंदूक हिसकली आणि त्याला खाली पाडलं. नंतर दोन्ही चोर घाबरून पळून गेले.
या घटनेदरम्यान कुणालाही काही इजा झाली नाही. James Kilcer असं या यूएस मरीनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. त्याने या दोन्ही चोरांना पळवून लावलं. सोशल मीडियावर घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं असून लोक त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.