शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी मेकअपसाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् तिकडूनच फरार झाली नवरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 15:26 IST

UP : आम्ही तुमच्यासाठी अजून एक वेगळी घटना घेऊन आलो आहोत. एक नवरी मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. तिथून ती तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. 

UP : सध्या ना सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे आणि असं झालंय की, लग्न म्हटलं की, काहीतरी अजब घटना समोर येणार हे ठरलेलंच दिसतं. दररोज लग्नातील वेगवेगळ्या विचित्र घटना समोर येतात. कधी काही दिलं नाही म्हणून नवरदेव लग्न मोडतो तर अजून काही कारणाने नवरी लग्न मोडते. आता आम्ही तुमच्यासाठी अजून एक वेगळी घटना घेऊन आलो आहोत. एक नवरी मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. तिथून ती तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. 

दुसरीकडे नवरदेव वरात घेऊन लग्न मंडपात पोहोचला होता. त्याला हे समजताच तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने पोलिसांना नवरीला शोधण्याची विनंती केली. नवरीकडील लोक नवरीचा शोध घेत आहे. अशात नवरदेवाकडील लोकांनी वरातीसाठी लागलेला खर्च परत देण्याची मागणी केली. 

लग्नाच्या काही वेळाआधी नवरी ब्युटी पार्लरमधून तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. इथे बेतवा घाटावरून वरात येणार होती. मुलाकडील लोक वरात घेऊन जाण्यासाठी तयार होते. तर मुलीकडील लोक वरातीचं स्वागत करण्यासाठी तयार होते. दरम्यान नवरीला मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये पाठवण्यात आलं होतं. तिची काकी तिच्यासोबत पार्लरमध्ये गेली होती. पण जेव्हा काकी ब्युटी पार्लरमधून एकटी घरी परतली तर एकच गोंधळ उडाला.

काकीने घरी आल्यावर नवरीच्या वडिलांना आणि नातेवाईकांना सांगितलं की, परिसरातीलच एक तरूण त्यांच्या मुलीला ब्युटी पार्लरमधून पळवून घेऊन गेला. लगेच याची माहिती नवरदेवाच्या परिवाराला देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या परिवारात निराशा पसरली.

नवरदेव मोहित म्हणाला की, तो तयारी करून वरात घेऊन जाण्यासाठी तयार होता. अचानक माहिती मिळाली की, नवरी ब्युटी पार्लरमधून पळून गेली. तर नवरदेवाची आई म्हणाली की, पतीच्या मृत्यूनंतर कसेतरी पैसे जमा करून मुलाच्या लग्नाची तयारी केली होती. तेही वाया गेले. ते कोण परत देणार?

पोलिसांनी सांगितलं की, दोन्हीकडील लोक पोलीस स्टेशनमध्ये आले होते. रात्रभर पोलिसांनी नवरीचा शोध घेतला. पण कुणीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यानुसार कारवाई केली जाईल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नJara hatkeजरा हटके