शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

अनोखी परंपरा : येथे जुंपते जावयांची कुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 05:18 IST

लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीला सासरी जाणाऱ्या जावयाचा ना-ना प्रकारे मानसन्मान आणि पाहुणचार केला जातो. पण या गावात मात्र समस्त जावईबापूंना एकमेकांशी कुस्ती खेळून आपला मर्दानीपणा आजमावावा लागतो.

- मनोज ताजनेगडचिरोली  - लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीला सासरी जाणाऱ्या जावयाचा ना-ना प्रकारे मानसन्मान आणि पाहुणचार केला जातो. पण गडचिरोली जिल्ह्यातल्या अडपल्ली या गावात मात्र समस्त जावईबापूंना एकमेकांशी कुस्ती खेळून आपला मर्दानीपणा आजमावावा लागतो. ही अनोखी परंपरा अनेक वर्षांपासून अडपल्ली या गावात सुरू आहे.गडचिरोलीपासून जवळच असलेल्या अडपल्लीत दिवाळीच्या पाडव्याला, अर्थात बलिप्रतिपदेला पाळली जाणारी ही परंपरा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही जावयांची कुस्ती पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने जमतात. वर्षभरात गावातील ज्या मुलीचे लग्न झाले तिच्या पतीला, अर्थात गावच्या जावयाला या पहिल्या दिवाळीचे रीतसर निमंत्रण पाठविले जाते. त्यानंतर जावई व मुलीला घेण्यासाठी जाऊन लक्ष्मीपूजनच्या दिवशीच गावात आणले जाते. त्यांना नवीन कपडे घेतले जातात. बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गार्इंची पूजा केली जाते. गार्इंचा कळप गावाबाहेर ज्या ठिकाणी जमतो त्या आखरावरच मग नवीन जावयांमध्ये कुस्ती लावली जाते.या कुस्तीत हार-जीत कोणतेही बक्षीस मिळवण्यासाठी नसली तरी गावात मिळणारा मान मोठा असतो. या खेळात गावकºयांचे चांगलेच मनोरंजन होते. त्यानंतर मिरवणुकीने वाजत-गाजत जावईलोकांना त्यांच्या सासºयाच्या घरी पोहोचविले जाते. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत कधी जावई उपलब्ध झाले नाही तर गावातील युवकांमध्येही कुस्ती रंगते. गावातच राहणाºया भोयर कुटुंबातील व्यक्ती या कुस्तीसाठी पंचाची जबाबदारी सांभाळतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेGadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्र