शपथविधीत अनोखी शिष्टाई

By admin | Published: May 24, 2014 02:38 AM2014-05-24T02:38:35+5:302014-05-24T02:59:29+5:30

नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणारा शपथविधी हा प्रशासन आणि आंतरराष्टÑीय संबंधाच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू करणारा ठरेल

Unique oath by oath | शपथविधीत अनोखी शिष्टाई

शपथविधीत अनोखी शिष्टाई

Next

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणारा शपथविधी हा प्रशासन आणि आंतरराष्टÑीय संबंधाच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू करणारा ठरेल. पण त्याचबरोबर विरोधकांशी सहकार्याचे धोरण अवलंबताना पक्षभेद बाजूला सारत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या सोहळ््याचे निमंत्रण पाठवून त्यांनी नवा पायंडा पाडला आहे. सार्क देशांच्या प्रमुखांना निमंत्रण देत मोदींनी शेजारी देशांशी संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. दुसरीकडे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रणाची पत्रे पाठवून विकास आणि वाढीसाठी सर्व राज्यांशी सहकार्याचे धोरण ठेवणार असल्याचा शब्द ते या निमित्ताने पाळणार आहेत. मोदींनी सर्व २८ राज्यपालांनाही शपथविधीसाठी निमंत्रित केले आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या इतिहासात एखाद्या पंतप्रधानाने सर्व मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निमंत्रण देण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्यांनी राज्यपालांनाही हाताने लिहिलेली पत्रे पाठविली आहे. केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर राज्यपाल बदलाचे वारे वाहू लागतात. अशा वातावरणात निमंत्रणाचे वैयक्तिक पत्र आणि त्या पाठोपाठ फॅक्स धडकल्याने राज्यपालांना सुखद धक्का बसला नसेल तर नवलच. तुमची शपथविधी सोहळ्याला असणारी उपस्थिती माझ्यासाठी आशीर्वाद असेल, हे शेवटचे वाक्य लक्ष वेधून घेणारे आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील काँग्रेस सदस्यांना या सोहळ््याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मोदी हे सार्क देशांच्या प्रमुखांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार काय ते अद्याप स्पष्ट झाले नाही. मंगळवारी सकाळी ज्यांना शक्य आहे, अशा नेत्यांसोबत ते चर्चा करतील, असे सूत्रांनी सांगितले. विविध देशांचे प्रमुख परतल्यानंतर मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळाची पहिली औपचारिक बैठक होण्याचीही शक्यता आहे.राष्टÑपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी होण्याची ही दुसरी वेळ असेल. याआधी अटलबिहारी वाजपेयी यांचा शपथविधी तेथे झाला होता. यावेळी दिल्लीत पारा भडकला आहे. त्यामुळे पाहुण्यांसाठी थंड वातावरणासाठी विशेष व्यवस्था करावी लागणार आहे.

Web Title: Unique oath by oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.