VIDEO : तुर्कीमधील आइसक्रीम विक्रेत्याची "हात"चलाखी! आमीर खानने शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 20:31 IST2017-10-08T19:48:37+5:302017-10-08T20:31:40+5:30
बाजारात वेगवेगळ्या शैलीत आपल्या मालाची जाहिरात करणाऱे विक्रेते तुम्ही पाहिले असतील. चहाच्या दुकानावर, लस्सी, ताक विक्रेतेही आपापले पदार्थ विकताना भन्नाट हातवारे करत असतात.

VIDEO : तुर्कीमधील आइसक्रीम विक्रेत्याची "हात"चलाखी! आमीर खानने शेअर केला व्हिडीओ
मुंबई - बाजारात वेगवेगळ्या शैलीत आपल्या मालाची जाहिरात करणाऱे विक्रेते तुम्ही पाहिले असतील. चहाच्या दुकानावर, लस्सी, ताक विक्रेतेही आपापले पदार्थ विकताना भन्नाट हातवारे करत असतात. बॉलिवूड अभिनेता आमीर खाननेही त्याच्या पाहण्यात आलेल्या अशाच एका आइसक्रिम विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुर्कस्तानला दिलेल्या भेटीदरम्यान आमीरला हा आइसक्रिम विक्रेता भेटला. त्यावेळी त्याच्याकडून आइसक्रिम घेतल्यावर त्या आइसक्रिम विक्रेत्याने भन्नाट करामती दाखवल्या.
Sabar ka phall meetha. Lovely Turkish ice cream :-) pic.twitter.com/hzsZpmUgDC
— Aamir Khan (@aamir_khan) October 7, 2017