शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तीने २३ लाख रूपयात खरेदी केला काळा घोडा, घरी आणून आंघोळ घालताच झाला लाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 17:05 IST

Black Horse Fraud : घोडा गर्द काळ्या रंगाचं असणं फार दुर्मीळ असतं. काळ्या रंगाच्या घोड्यांची किंमत जास्त असते. इतर रंगांचे किंवा मिक्स कलरचे घोडे काळ्या रंगाच्या घोड्यांच्या तुलनेत स्वस्त मिळतात.

Black Horse Fraud : आजकाल मार्केटमधूनही काहीही खरेदी करायचं असेल तर काळजीपूर्वक खरेदी करावी लागते. जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमची फसवणुकही होऊ शकते. पंजाबमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अशीच फसवणूक झाली आहे. ज्यामुळे त्याला आता पश्चाताप होत आहे. या व्यक्तीने साधारण २३ लाख रूपये देऊन एका व्यापाऱ्याकडून काळ्या रंगाचा घोडा खरेदी केला होता. पण जसा तो घोड्याला घरी घेऊन आला आणि त्याची आंघोळ घातली तसा घोड्याचा रंग लाल झाला.

घोडा गर्द काळ्या रंगाचं असणं फार दुर्मीळ असतं. काळ्या रंगाच्या घोड्यांची किंमत जास्त असते. इतर रंगांचे किंवा मिक्स कलरचे घोडे काळ्या रंगाच्या घोड्यांच्या तुलनेत स्वस्त मिळतात. काळे घोडे खरेदी करण्याची आवड पंजाबच्या रमेश कुमार यांना महागड पडली. रमेश यांनी २३ लाख एक काळ्या रंगाचा घोडा खरेदी केला आणि तो घेऊन घरी आले. पण त्याना हे माहीत नव्हतं की, त्यांची फसवणूक झाली.

पंजाबच्या सुनाम शहरातील संगरूरमध्ये राहणारे रमेश कुमार यांनी एका व्यापाऱ्याकडून घोडा खरेदी केला होता. या सौद्यात तीन लोक सहभागी होते. तिघांनी मिळून २३ लाख रमेश कुमार यांना काळा घोडा विकला होता. पण रमेश कुमार यांना काही समजलं नाही. ते घोडा घेऊन घरी आले आणि रमेश यांनी घोड्याला आंघोळ घातली. आंघोळ घालताच त्यांची फसवणूक झाल्याचं समोर  आलं.

या खरेदीत रमेश यांनी व्यापाऱ्यांना ७ लाख ६० हजार रूपये कॅश दिली होती. बाकी रकमेचे दोन चेक त्यांना रमेश यांनी दिले होते. एकूण २३ लाख रूपयांचं पेमेंट व्यापाऱ्यांना करण्यात आलं होतं. आता रमेश कुमार यांनी तिन्ही व्यापाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस आता या प्रकरणाची  चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी