(Image Credit : Ewout Huibers/Dezeen)
पहिल्या नजरेत जेव्हा तुम्ही हा फोटो बघाल तर तुम्हाला वाटू शकतं की, यात जे दिसतंय ती एखादी गोडाऊन असेल. काही लोकांना हे एका एखादं आर्ट स्ट्रक्चरही वाटू शकतं. पण हे यातील काहीच नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हे एक घर असून या घराला 'बेस्ट इंटिरिअर २०१९' पुरस्कार मिळाला आहे. हे घर नेदरलॅंडमध्ये असून यात घरात सर्वच सुविधा आहेत.
दरवर्षी आर्किटेक्चर वेबसाइट 'डीजीन' जगभरातील सर्वात सुंदर इमारतींचा सन्मान करते. क्रिस कोलासिस आणि आय२९ ने तयार केलेल्या या छोट्या हॉलिडे होमला यावर्षीचा बेस्ट इंटिरिअर हा पुरस्कार दिलाय. या स्पर्धेत आर्किटेक्चर, इंटेरिअर आणि डिझाइनवर मुख्य फोकस केला जातो. हे घर चार ब्लॉक्समध्ये तयार करण्यात आलंय.
हे घर अम्स्टरडॅमच्या बाहेरील परिसरात तयार करण्यात आलंय. परीक्षकांनी या घराला पुरस्कार यासाठीही दिला कारण या घरातील छोट्यातील छोटी जागेचा फार चांगला वापर करण्यात आलाय. हे घर केवळ ६०० स्क्वेअर फूटमध्ये उभारलंय. यात कॉंक्रीटचे चार ब्लॉक केले, जे एकमेकांशी कनेक्टेड आहेत.
आय२९ कंपनीचे डिझायनर जेरोन डेलेंसन आणि जॅस्पर जॅनसनने 'इनसायडर' सोबत बोलताना सांगितले की, चारही ब्लॉक्सचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करण्यात आला आहे. एक घराची एन्ट्री आहे, दुसरं किचन, डायनिंग स्पेस, लिव्हिंग रूम आणि चौथा बेडरूम. यात बेडरूममधील ब्लॉक सर्वात मोठा तयार करण्यात आला आहे. हा दोन मजल्यांचा आहे.
जेरोन आणि जॅस्पर म्हणाले की, 'हे घर डिझाइन करताना आम्ही याला एक साधं आणि इनोव्हेटिव्ह घर करण्याचा प्लॅन केला होता. आमचा प्रयत्न हाच होता की, शक्य तितकं हे घर इको फ्रेन्डली करायचं. कलर सुद्धा व्हाईट, ग्रे आणि वुड कलर ठेवले आहेत'.