शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलरचा दावा, २०२२ साली एक सेलिब्रिटी उघड करणार त्याच्या मृत्युचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:25 IST

एका सेलिब्रिटीच्या मृत्यूचं (Celebrity death) रहस्य उलगडणार आहे, असा दावा एका स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने (self-proclaimed time traveller)  केला आहे. त्याने २०२२ सालातील अनेक भविष्यवाणी केल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांत बऱ्याच सेलिब्रिटींचा मृत्यू झाला. याची कारणं वेगवेगळी होती. काही सेलिब्रिटींच्या संशयास्पद मृत्यू झाला, ज्यांची मृत्यू प्रकरणं बरेच महिने चर्चेत होती. आता अशाच एका सेलिब्रिटीच्या मृत्यूचं (Celebrity death) रहस्य उलगडणार आहे, असा दावा एका स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने (self-proclaimed time traveller)  केला आहे. त्याने २०२२ सालातील अनेक भविष्यवाणी केल्या आहेत.

एका व्यक्तीने म्हटलं आहे आहे येणाऱ्या काळात घडणाऱ्या घटनांबाबत त्याला सर्वकाही माहिती आहे. या घटना कधी, कुठे आणि कशा घडणार आहेत याची कल्पना आपल्याला आहे.  आपण २२३६ सालातून परत आलो आहोत. तोपर्यंत घडलेल्या सर्व घटना आपल्याला माहिती आहेत. २०२२ सालात अशा मोठ्या घटना घडणार आहेत, ज्याबाबत दुसऱ्या कुणालाच माहिती नाही.  लवकरच एक बडा सेलिब्रिटी आपल्या मृत्यूच्या खोट्या नाटकावरून पडदा हटवणार आहे, असा दावा त्याने केला आहे.

सोशल मीडिया टिकटॉकवर त्याने आपला व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याने म्हटल आहे. मी खरंच एक टाइम ट्रॅव्हलर आहे, यावर काही लोकांना विश्वास नाही. त्यामुळे मी काही अशा घटनांबाबत सांगणार आहे, ज्या २०२२ सालात घडणार आहेत. १७ जून आतापर्यंतचा सर्वात मोठा समुद्री जीव प्रशांत महासागरात सापडेल. १६ सप्टेंबरला एक लोकप्रिय संगीतकार स्वतः समोर येऊन आपल्या मृत्यूबाबत सांगेल. आपण मृत्यूचं खोटं नाटक केलं हे स्वीकार करेल (Dead celebrity will come back in September). २०२२ च्या अखेर माणसांच्या कामांच्या जागेत रोबो आपली २० टक्के जागा मिळवतील. आता हे सर्व खरं होतं की नाही याकडे लक्ष लागलं आहे.

आता हा फेमस सेलिब्रिटी कोण असणार याबाबत जो तो आपले तर्कवितर्क लढवत आहेत. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार काहींच्या मते, तो मायकल जॅक्सन किंवा तुपैक शकूर असेल. तर एका युझरने म्हटलं, मी गेल्या वर्षी तुमच्या सर्व भविष्यवाणी लिहिल्या. ज्यात सप्टेंबर २०२१ मध्ये इतिहासातील सर्वात भीषण वादळ येणार असल्याचं म्हटलं होतं पण आतापर्यंत असं झालं नाही.

कित्येक टिकटॉक युझर्स असे आहेत, जे या टाइम ट्रॅव्हरच्या टिकटॉक अकाऊंटला फॉलो करत आहेत. ते म्हणाले की हा तथाकथित ट्राइम ट्रॅव्हलर  जेव्हा त्याचे दावे खोटे ठरतात तेव्हा तो स्वतःचे व्हिडीओज अकाऊंटमधून डिलीट करतो. त्यामुळे या व्यक्तीच्या दाव्यात किती तथ्यता आहे माहिती नाही पण त्याने जे सांगितलं आहे, ते जाणून घेण्याची इच्छा, उत्सुकता प्रत्येकाला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके