Antarctica News : भारतापासून साडेसात हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या अंटार्क्टिकाच्या बर्फाळ जमिनीखाली एक रहस्य उलगडले आहे. हे पाहून शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा 1.2 मिलियन वर्षे जुना बर्फाचा तुकडा पृथ्वीचा हवामान इतिहास समजून घेण्याची अतिशय उपयुक्त ठरणार आहे. शास्त्रज्ञ याला टाईम मशीन म्हणत आहेत. चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर एका आंतरराष्ट्रीय टीमने -35 अंश सेल्सिअस तापमानात 2.8 किमी खोल बर्फातून हा याला बाहेर काढले.
शोध कसा लागला?आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, शास्त्रज्ञांच्या टीमने 9,186 फूट लांब बर्फाचा भाग बाहेर काढला, ज्यामध्ये लाखो वर्षे जुन्या वातावरणाचे बुडबुडे अडकले आहेत. हे बुडबुडे त्यावेळच्या वातावरणातील स्थितीची अचूक माहिती देतात. हा नमुना पृथ्वीवरील हवामान बदल समजून घेण्यासाठी अमूल्य माहिती प्रदान करेल. हा शोध युरोपियन युनियनने निधी पुरवलेल्या 'बियॉन्ड एपिका' या प्रकल्पाचा भाग आहे.
बर्फात दडलेले हवामान बदलाचे रहस्यया बर्फात कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनसारख्या हरितगृह वायूंची माहिती दडलेली असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. याद्वारे विश्लेषण सूर्यप्रकाश, ज्वालामुखीय क्रियाकलाप आणि पृथ्वीच्या कक्षीय स्थितीतील बदल, यासारखे घटक हवामानावर कसा परिणाम करतात, हे उघड होईल. या संशोधनामुळे पृथ्वीवरील हिमयुगाचे स्वरूप अचानक कसे बदलले आणि त्याचा मानवी प्रजातींवरही परिणाम झाला, याचा तपशील मिळणार आहे.
मानव आणि हिमयुग यांच्यातील दुवासुमारे 1 मिलियन वर्षांपूर्वी पृथ्वीवरील हिमयुग चक्रात बदल झाला. ज्याने आदिम मानवी प्रजातींच्या अस्तित्वाला आव्हान दिले होते. शास्त्रज्ञांना आशा आहे की या बर्फाच्या कोरचा अभ्यास केल्याने पृथ्वीच्या पर्यावरणाने त्या वेळी कसा प्रतिसाद दिला आणि जीव कसे टिकले हे समजण्यास मदत होईल. हा शोध 1996 मध्ये सुरू झालेल्या प्रकल्पाचा विस्तार आहे. आता या नवीन शोधामुळे पृथ्वीचा जुना हवामान इतिहास उघड होऊ शकतो.