(Image Credit : irishmirror.i)
वाघ हरणाची शिकार करतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियात बघितले असतील. जास्तीत जास्त व्हिडीओजमध्ये वाघ मोठ्या मेहनतीने हरणाची शिकार करतो. पण तुमच्या मनात कधी प्रश्न पडलाय का की, वाघ हरणाची शिकार सहजपणे कसा करू शकतो? याचा शोध घेण्यासाठी इंग्लंडच्या ब्रिस्टल युनिव्हर्सिटीने रिसर्च केला. वैज्ञानिकांनुसार, मनुष्य सगळ्याप्रकारचे रंग बघून ते ओळखू शकतो. पण जनावरांचं तसं नसतं. हे समजावून सांगण्यासाठी वैज्ञानिकांनी कॉम्प्युटर स्टीमुलेशन तंत्रज्ञानाचा आधार घेतला होता.
हरणाला वाघ देतो चकमा
संशोधक डॉ. जॉन फेनेल म्हणाले की, हरिण केवळ हिरव्या आणि निळ्या रंगाची ओळख करू शकतात. वाघ याच गोष्टीचा फायदा घेतो. वाघाचा रंग हा केशरी-पिवळा असतो. हा रंग हरणाला हिरवा दिसतो. वाघ हरणाला झाड-झुडूप असल्याचं भासवतात. संशोधकांनी यासाठी कॉम्प्युटरची मदत घेतली. यात त्या ठिकाणांच्या फोटोंचा समावेश केला, ज्या ठिकाणी जनावरे राहतात. आणि स्टीमुलेट तंत्रज्ञानाच्या मदतीने पाहिलं गेलं की, हरणाला वाघ कसा दिसतो. रॉयल सोसायटी जर्नलमध्ये डॉ. फेनेल यांनी लिहिले की, दोन रंग बघू शकणाऱ्या जनावरांना वाघाचा रंग फार प्रभावी दिसू लागतो.
डॉ. जॉन फेनेल यांच्यानुसार, स्टीमुलेटिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे कळून येतं की, डायक्रोमेट्स जनावरांना जग कसं दिसतं. डायक्रोमेट्स हे ती जनावरे असतात, ज्यांना लाल आणि हिरव्या रंगातील फरक कळत नाही. आता याचीही माहिती घेतली जात आहे की, ते ओळख पटवण्यासाठी किती रंगांना ओळखू शकतात.
वाघाचा रंग हा केशरी-पिवळाच का असतो यावरही वैज्ञानिकांनी रिसर्च केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, सस्तन प्राण्यांसाठी जैविक रसायन जबाबदार असतात. वाघाच्या केशरी-पिवळ्या रंगासाठी फियोमिलेनिन रसायन जबाबदार असतं. रिसर्चनुसार, जी जनावरे तीन रंगांची ओळख पटवू शकतात ते अशाप्रकारचे भ्रम तोडण्यात यशस्वी होतात.