शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
2
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
3
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाहीतर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
मतदान केलं नाही म्हणून पक्षाने पाठवली नोटीस; BJP खासदार म्हणाले, "सभेला बोलवलं नाही तर मी..."
5
असं काय झालं की RBIनं सरकारला दिले ₹२.११ लाख कोटी, इमर्जन्सी रिस्क बफर का वाढवला?
6
अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप
7
बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
8
मुकेश अंबानींच्या ₹१५००० कोटींच्या अँटिलियापेक्षाही मोठ्या घरात राहतात राधिकाराजे गायकवाड; माहितीये कोण आहेत त्या?
9
पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
10
कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'
11
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
12
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
13
मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली
14
चोरी गेलेले, हरवलेले हजारो मोबाइल दिले परत; सीईआयआर पोर्टलच्या मदतीने केला तपास
15
बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
16
दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत; आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती 
17
२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही
18
अल्पवयीन मुलाला झाडाला बांधून मारहाण, श्रीरामपूरमधील घटना : चौघांवर गुन्हा दाखल
19
‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार
20
मातोश्रीच्या ‘लाचार श्री’ना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा; कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी 

एक असं रेल्वे स्टेशन जे एका मुलीमुळे बंद केलं होतं, 42 वर्ष एकही व्यक्ती फिरकला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 3:04 PM

Indian Railway : हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या पुरूलिया जिल्ह्यातील असून याचं नाव बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन असं आहे. हे स्टेशन भारतातील सर्वात हॉंन्टेड रेल्वे स्टेशनपैकी एक आहे.

Indian Railway :  देशात रेल्वेचं मोठं जाळं आहे. शेकडो रेल्वे स्टेशनवरून लाखो लोक रोज वेगवेगळ्या ठिकाणी जातात. भारतातील काही रेल्वे स्टेशनही नावंही अजब आहेत. तर काही स्टेशनच्या अनोख्या कहाण्या आहेत. अशीच एक कहाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. देशातील एक रेल्वे स्टेशन एका मुलीमुळे बंद ठेवण्यात आलं होतं. चला जाणून घेऊ काय आहे ही घटना...

देशातील एखादं रेल्वे स्टेशन एका मुलीमुळे बंद झालं असल्याचं ऐकल्यावर अर्थातच कुणालाही विचित्र वाटेल. त्यातल्या त्यात हे स्टेशन सुरू होऊन केवळ सातच वर्षे झाली होती. अनेकांना ही गंमतही वाटू शकते, पण ही गंमत नाही तर खरं आहे. हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या पुरूलिया जिल्ह्यातील असून याचं नाव बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन असं आहे. हे स्टेशन भारतातील सर्वात हॉंन्टेड रेल्वे स्टेशनपैकी एक आहे.

हे रेल्वे स्टेशन १९६० मध्ये सुरू करण्यात आलं होतं. रेल्वे सेवा सुरू झाल्यावर काही वर्षे या स्टेशनवर सगळं काही व्यवस्थित होतं. पण अचानक एक विचित्र घटना घडू लागली. १९६७ मध्ये बेगुनकोडोर रेल्वे स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याने स्टेशनवर एका महिलेचं भूत पाहिल्याचा दावा केला होता. सोबतच अशीही अफवा पसरली होती की, याच स्टेशनवर या मुलीचा एका रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी रेल्वे कर्मचाऱ्याने लोकांना याबाबत सांगण्याचा प्रयत्नही केला, पण लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं.

पण खरी अडचण तेव्हा वाढली जेव्हा बेगुनकोडोरचे स्टेशन मास्टर आणि त्यांचा परिवात रेल्वे क्वार्टरमध्ये मृत आढळले. नंतर येथील लोकांनी असाही दावा केला होता की, त्यांच्या मृत्यूमागे त्याच महिलेच्या भूताचा हात आहे. लोक सांगू लागले होते की, जेव्हा एखादी रेल्वे येथून जाते तेव्हा त्या मुलीचं भूतही रेल्वेसोबत धावू लागतं. 

या विचित्र घटनांनंतर बेगुनकोडोर हे रेल्वे स्टेशन चांगलंच चर्चेत आलं आणि हेच रेल्वेच्य रेकॉर्डमध्येही नोंदवलं आहे. लोकांमध्ये या मुलीच्या कथित भूताची इतकी भिती पसरली की, लोक स्टेशनवर येणं बंद झालं. इतकेच नाही तर स्टेशनवरील कर्मचारीही भीतीमुळे पळून जात होते.

असे मानले जाते की, जेव्हाही एखाद्या रेल्वे कर्मचाऱ्याची पोस्टिंग इथे होत होती, ते लगेच इथे येण्यास नकार देत होते. नंतर तर इथे रेल्वे थांबणंह बंद झालं. कारण भीतीमुळे कुणाला इथे उतरायचं देखील नव्हतं आणि ना कुणी रेल्वेत बसण्यासाठी येत होते. त्यानंतर संपूर्ण स्टेशन सामसूम झालं.असे म्हणतात की, या रेल्वे स्टेशनवरील कथित भूताची चर्चा पुरूलिया जिल्ह्यापासून ते कोलकाता आणि पुढे रेल्वे मंत्रालयापर्यंत झाली होती. असेही सांगितले जाते की, जेव्हा येथून एखादी रेल्वे जात होती तेव्हा लोको पायलट स्टेशन येण्याआधीच स्पीड वाढवत होते. तसेच लोकही स्टेशन येण्याआधीच दारं-खिडक्या लावून घेत होते.

तब्बल ४२ वर्षांनी म्हणजे २००९ मध्ये गावातील लोकांच्या मागणीवरून तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा हे रेल्वे स्टेशन सुरू केलं. तेव्हापासून आतापर्यंत भूताचा असा काही दावा करण्यात आलेला नाही. पण आजही लोक सायंकाळी या स्टेशनवर जाणे टाळतात. सध्या इथे १० रेल्वे थांबतात. या स्टेशनची इतकी चर्चा झाली होती की, लोक त्यामुळेच हे स्टेशन बघण्यासाठीही येतात.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेIndian Railwayभारतीय रेल्वे