शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अरे देवा! 'ही' महिला आहे सर्वात कंजूस करोडपती; एका महिन्यात करते 'इतकाच' खर्च, खाते कॅट फूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 15:28 IST

तब्बल 40 कोटींहून अधिक संपत्ती आहे. आपल्या महिन्याचे बजेट निश्चित केले आहे. या बजेटबाहेर ती एक रुपयाही खर्च करत नाही.

एक महिला स्वतःला 'जगातील सर्वात कंजूस करोडपती' म्हणत आहे. तिचा खर्च कमी ठेवण्यासाठी ती कधीच नवीन काही खरेदी करत नाही. तर कधी मांजरीचे अन्न खात असल्याचे ती सांगते. तिच्याकडे तब्बल 40 कोटींहून अधिक संपत्ती आहे. तिने आपल्या महिन्याचे बजेट निश्चित केले आहे. या बजेटबाहेर ती एक रुपयाही खर्च करत नाही.

एमी एलिझाबेथ  (Aimee Elizabeth) असं या 51 वर्षीय करोडपती महिलेचं नाव आहे. ती अमेरिकेतील लास वेगासची रहिवासी आहे. तिची एकूण संपत्ती 43 कोटींहून अधिक आहे. पण एमी तिचे पैसे खर्च करण्याबाबत खूप कडक आहे. एमी म्हणते की तिने स्वतःसाठी 80,000 रुपये महिन्याचं बजेट निश्चित केले आहे. तिला तिच्या मासिक बजेटपेक्षा जास्त खर्च करणे आवडत नाही. पैसे वाचवण्यासाठी तिने अनेक युक्त्या शोधल्या आहेत.

उदाहरणार्थ, ती आपलं वॉटर हीटर एक मिनिटही जास्त चालू ठेवत नाही. घरातील इतर विद्युत उपकरणांबाबतही असेच होते. यामुळे त्यांची दर महिन्याला मोठी बचत होते. एका टीव्ही शोमध्ये, एमीने पैसे वाचवण्याचा सर्वात विचित्र मार्ग सांगितला. ती म्हणाली- कधी कधी ती कॅट फूड पण खाते. एमीने स्वतः कबूल केले की तिने तिच्या पाहुण्यांनाही मांजरीचे अन्न दिले आहे. 

डब्याऐवजी सुट्ट सामान विकत घेते जेणेकरून ते स्वस्त होईल. एमी म्हणते की, लोकांना हे विचित्र वाटेल पण मला त्याची पर्वा नाही, कारण त्यामुळे पैसे वाचतात. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एमी एक यशस्वी रिअल इस्टेट गुंतवणूकदार, लेखक आणि व्यवसाय सल्लागार आहे. टीएलसीच्या रिएलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. यामध्ये त्यांनी तिच्या आयुष्याशी संबंधित सर्व पैलू उलगडले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके