शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील कॉम्प्युटर चोरी करून पळाला चोर, पण त्याआधी लिहून गेला - It's Me DHOOM 4

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:02 IST

Thieves Steal Computers From School:या अजब घटनेत चोरांनी ओडिशाच्या शाळेतून कॉम्प्युटर आणि इतर काही वस्तूंची चोरी केली आणि एका ब्लॅक बोर्डवर मेसेज लिहिला की, : 'इट्स मी धूम 4'.

Thieves Steal Computers From School: लोकप्रिय बॉलिवूड सिनेमा 'धूम 2' तुम्ही नक्कीच पाहिला असेल. ज्यात हृतिक रोशन चोराच्या भूमिकेत होता. तो चोरी करून एक खूण सोडून जात होता. ज्यावरून लोकांना समजत होतं की, चोरी करणारी व्यक्ती एकच आहे आणि तो खूप हुशार आहे. सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात एका चोराने चोरी केल्यानंतर शाळेतील ब्लॅक बोर्डवर लिहिलं की, ''इट्स मी धूम 4' (It's Me Dhoom 4). 

या अजब घटनेत चोरांनी ओडिशाच्या शाळेतून कॉम्प्युटर आणि इतर काही वस्तूंची चोरी केली आणि एका ब्लॅक बोर्डवर मेसेज लिहिला की, : 'इट्स मी धूम 4'. ही घटना गेल्या शुक्रवारी नबरंगपूरच्या इंद्रावती हायस्कूलमधील आहे.

शनिवारी सकाळी शाळेतील चपराश्याला मुख्य गेट तुटलेलं दिसलं आणि त्याने लगेच याची सूचना मुख्याध्यापकांना दिली. त्यांनी नंतर पोलिसांना बोलवलं. रिपोर्टनुसार, चोरांच्या एका टोळीने कथितपणे शाळेत प्रवेश केला आणि एक कॉम्प्युटर, एक फोटोकॉपिअर, एक वजन मशीन, साऊंड बॉक्स आणि इतरही काही वस्तू लंपास केल्या. 

चोरांनी पोलिसांना आव्हान दिलं की, 'मी धूम - 4 आहे. आम्ही परत येऊ'. चोरांनी ब्लॅक बोर्डवर पुढे लिहिलं होतं की, आम्ही लवकरच येऊ. शाळेतील मुलं आम्हाला पकडू शकत असतील तर त्यांनी पकडावं'. त्यांनी ब्लॅक बोर्डवर काही नंबरही लिहिले होते. आश्चर्याची बाब म्हणजे ब्लॅक बोर्डवर लिहिलेला नंबर शाळेतीलच एका शिक्षकाचा आहे. या शिक्षकाने सांगितलं की, त्याला काहीच कल्पना नाही की, चोरांनी त्यांचा  नंबर का लिहिला. पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :OdishaओदिशाThiefचोरJara hatkeजरा हटके