चोरीचं डेबिट कार्ड वापरून जिंकले 42 कोटीची लॉटरी, पण एक पैसाही मिळाला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 05:32 PM2024-04-01T17:32:38+5:302024-04-01T17:33:16+5:30

बोल्टनला राहणारा जॉन-रॉस वॉटसन आणि मार्क गुडरामने लॉटरी तिकीट खरेदी करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या बॅंक कार्डचा वापर केला.

Thief won 42 crores in lottery with stolen debit card but did not get money | चोरीचं डेबिट कार्ड वापरून जिंकले 42 कोटीची लॉटरी, पण एक पैसाही मिळाला नाही!

चोरीचं डेबिट कार्ड वापरून जिंकले 42 कोटीची लॉटरी, पण एक पैसाही मिळाला नाही!

असं म्हणतात की, जर तुमच्या नशीबात काही लिहिलेलं असेल तर ते तसंच होतं. एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालं. चोराने एका व्यक्तीचं डेबिट कार्ड चोरी केलं. त्या पैशातून त्यांनी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. चोरांना वाटलं लॉटरी लागली तर पैसे अकाऊंटमध्ये येतील. पण झालं असं की, त्यांना एक रूपयाही मिळाला नाही. दुसरीकडे ज्या व्यक्तीचं ते डेबिट कार्ड होतं तो मात्र कोट्याधीश बनला.

द सनच्या रिपोर्टनुसार, बोल्टनला राहणारा जॉन-रॉस वॉटसन आणि मार्क गुडरामने लॉटरी तिकीट खरेदी करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या बॅंक कार्डचा वापर केला. जेव्हा लॉटरीचा निकाल आला तेव्हा ते नाचू लागले होते. दोघांनी 4 मिलियन पाउंड म्हणजे 42 कोटी रूपयांचं जॅकपॉट जिंकला होता. एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं होतं. ज्यात दोघेही नाचताना दिसत होते. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.

मार्क गुडरामने लॉटरीचे पैसे मागितले तेव्हा चौकशीतून वेगळंच काही समोर आलं. तेव्हा समजलं की, त्यांच्याकडे बॅंक खातंच नाही. जर बॅंक खातं नाही तर ज्याद्वारे त्यानी लॉटरीचं तिकीट काढलं ते कार्ड कुणाचं होतं? अशात लॉटरी अधिकाऱ्यांना त्यांच्यावर संशय आला आणि चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान गुडरामने सांगितलं की, तिकीट खरेदी करण्यासाठी त्यांनी जॉन नावाच्या एका मित्राच कार्ड वापरलं होतं. 

पुढे चौकशीतून आणखी खळबळजनक खुलासे झाले. असं समोर आलं की, ज्या कार्डने दोघांनी लॉटरी तिकीट खरेदी केले होते, ते कार्डचं सुद्धा नव्हतं. ते चोरी करण्यात आलेलं डेबिट कार्ड होतं. ते मुळाता जोशुआ नावाच्या एका व्यक्तीचं होतं. चोरांनी त्याचाच वापर करून लॉटरी काढली होती. त्यांना अंदाजही नव्हता की, ते असे अडकतील. नंतर दोघांनाही 18 महिन्यांची शिक्षा झाली.

Web Title: Thief won 42 crores in lottery with stolen debit card but did not get money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.