गर्लफ्रेंडच्या कुटुंबीयाला भेटायला गेला अन् एका उत्तरानं युवकाला धक्काच बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 12:21 IST2022-04-29T12:20:50+5:302022-04-29T12:21:21+5:30

युवकाने रेडिट वेबसाइटवर या घटनेचा किस्सा सांगितला. तो एका मुलीसोबत गेल्या ९ महिन्यापासून रिलेशनशिपमध्ये होता

The young man was shocked when he went to visit his girlfriend's family | गर्लफ्रेंडच्या कुटुंबीयाला भेटायला गेला अन् एका उत्तरानं युवकाला धक्काच बसला

गर्लफ्रेंडच्या कुटुंबीयाला भेटायला गेला अन् एका उत्तरानं युवकाला धक्काच बसला

एका मुलीनं तिच्या बॉयफ्रेंडला बहिणीशी भेट करण्यासाठी घेऊन गेली. युवकाला गर्लफ्रेंडच्या बहिणीचा चेहरा ओळखीचा वाटला. तेव्हा युवकाने तिला विचारले मी तुला कुठंतरी पाहिलं आहे. पण आठवत नाही. त्यावर गर्लफ्रेंडच्या भावानं जे उत्तर दिले ते ऐकून युवकाला धक्काच बसला. त्याने शरमेने मान खाली घातली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यावर अनेकजण कमेंट्स करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

युवकाने रेडिट वेबसाइटवर या घटनेचा किस्सा सांगितला. तो एका मुलीसोबत गेल्या ९ महिन्यापासून रिलेशनशिपमध्ये होता. ते दोघं पहिल्यांदाच कुटुंबाला ईस्टर येथे भेटले. याआधी युवकाने गर्लफ्रेंडच्या कुटुंबाचे फोटो पाहिले होते. परंतु जेव्हा युवक गर्लफ्रेंडच्या बहिणीला भेटला तेव्हा तिचा चेहरा वेगळाच होता. त्याने बहिणीला कुठेतरी पाहिलं आहे असं त्याला जाणवू लागलं. युवकाने गर्लफ्रेंडच्या बहिणीला विचारलं तू कुठे काम करतेस. त्यावर मुलीने उत्तर दिले मी एक अभिनेत्री आहे. तेव्हा युवकाने हो तरीच मी तुला कुठेतरी पाहिलं हे जाणवत होतं. तुझा चेहरा ओळखीचा वाटत होता असं म्हटलं.

तुझा चेहरा मी पाहिला आहे परंतु कुठे पाहिला हे आठवत नाही असं म्हणत युवकाने गर्लफ्रेंडच्या बहिणीला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, मी काही व्यावसायिक जाहिराती केल्या आहेत त्यात पाहिलं असेल असं सांगत तिने विषय बदलला. हे सर्व घडत असताना गर्लफ्रेंडचा भाऊही तिथेच होता. त्याने १० मिनिटांनी युवकाला गर्लफ्रेंड आणि तिच्या बहिणीपासून वेगळं नेले आणि तेव्हा सांगितले. तु जिला सारखं पाहिल्यासारखं म्हणतोय ती अभिनेत्री असून एडल्ट इंडस्ट्रीत काम करते असं म्हणाला. युवकाला हे ऐकून धक्काच बसला.

इतकेच नाही तर भावाने बहिणीचा एक व्हायरल व्हिडीओ दाखवत म्हणाला हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. त्याचे मीम्स आले होते. युवकाला तेव्हा लज्जास्पद झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर या चौघांनी ईस्टरमध्ये नियोजित कार्यक्रम पार पडला आणि तिथून निघून गेले. घरीजातेवेळी गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला सांगितले की, माझी बहिण पॉर्न इंडस्ट्रीत काम करते. आमचे आई वडील वयोवृद्ध असल्याने तिला हे काम करावं लागलं. ती अभिनेत्री म्हणून सांगतो परंतु तिच्या आयुष्याबद्दल इतरांना कुणालाही माहिती नाही असं गर्लफ्रेंडनं सांगितले.

Web Title: The young man was shocked when he went to visit his girlfriend's family