पत्नीचा लॅपटॉप उघडताच पतीला बसला धक्का; सत्य उघड होताच शरमेने मान खाली गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 14:58 IST2022-01-26T14:57:16+5:302022-01-26T14:58:02+5:30
एकेदिवशी पत्नी बाजारात गेली असता संधी मिळताच पतीनं तिचा लॅपटॉप उघडून पाहिला

पत्नीचा लॅपटॉप उघडताच पतीला बसला धक्का; सत्य उघड होताच शरमेने मान खाली गेली
कुठलंही नातं टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तो म्हणजे विश्वास. परंतु काही जण नात्यात विश्वासघात करत असतात ज्याचा खुलासा झाल्यानंतर आयुष्यभर त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. असेच एक प्रकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका पत्नीनं तिच्या पतीसोबत जे काही केले ते पाहून त्याला शॉक बसला. या पतीनं त्याच्यावर घडलेला प्रसंग शेअर केला आहे.
‘द सन’च्या वृत्तानुसार, एका पतीने पत्नीच्या नकळत तिचा लॅपटॉप उघडला तेव्हा त्यातील पत्नीचे कारनामे पाहून त्याला धक्का बसला. पत्नीच्या लॅपटॉपमध्ये तिचा पतीच्या मित्रासोबतचा न्यूड फोटो होता. पती आणि पत्नी दोघांचे वय ४८ आहे. परंतु पत्नी अशाप्रकारे पतीचा विश्वासघात करतेय याची भनकही त्याला लागली नाही. पतीचा मित्र हा त्याच बिल्डिंगमध्ये राहतो जिथे हे कपल्स राहायला आहे. ते नेहमी एकमेकांशी संवाद साधतात. माझी पत्नी पुस्तकं घेण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी जाते. या मित्राचे वय ५० आहे आणि तो घटस्फोटीत आहे. त्याला एक मुलगा आहे.
पती पुढे म्हणाला की, लॉकडाऊन काळात माझ्या पत्नीने मित्राच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबत ती पुस्तकांचे काम करत होती. दोघंही फोनवर बोलायचे. या काळात पत्नी स्वत:च्या तब्येतीकडे विशेष लक्ष देऊ लागली. वारंवार जिमला जात ती फिट राहण्यासाठी मेहनत घेत होती. त्याच्याआधी कधीही असं झालं नव्हतं. मात्र पत्नीमध्ये झालेला बदल पतीला दिसत होता. पत्नी पार्लरला जास्त वेळ जायला लागली. नवीन कपडे, मेकअप या गोष्टी वाढल्या. पत्नीचं बदललेलं स्वरुप पाहून पतीला तिच्या हालचालींवर संशय येऊ लागला.
त्यानंतर एकेदिवशी पत्नी बाजारात गेली असता संधी मिळताच पतीनं तिचा लॅपटॉप उघडून पाहिला. त्यात जे फोटो होते ते पाहून पती हैराण झाला. अंतरवस्त्रात पत्नी आणि पतीचा मित्र दोघांचे सोबत फोटो होते. दोघांचे प्रायव्हेट फोटोही होते. जेव्हा पत्नी बाजारातून परतली तेव्हा पतीनं लॅपटॉपमधून फोनमध्ये घेतलेले फोटो दाखवले. तेव्हा पत्नीला काहीच कळायचं बंद झालं. त्यानंतर पत्नीनं तिच्या अफेअरबाबत खुलासा केला. हे सगळं संपवून नातं पुन्हा नव्याने सुरु करु असं पत्नी म्हणाली. परंतु पतीने आता विश्वास उडाला असं सांगत तिच्याशी नातं तोडलं. आता पत्नी आणि मित्र दोघंही एकमेकांसोबत काम करतात असं पती म्हणाला.