शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बोंबला! लग्नात स्टेजवरच रोमॅंटिक झाला नवरदेव, केसं असं काही की नवरीने लग्नास दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 10:32 IST

नवरीला परिवारातील लोकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती काही लग्नास तयार झाली नाही.

लग्नाच्या सीझनमध्ये लग्नासंबंधी अनेक अजब हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या संभलमधून समोर आली आहे. इथे एका नवरदेवाला स्टेजवरच रोमॅंटिक होणं महागात पडलं. त्याने असं काही केलं की, नवरीने तिथेच त्याला लग्न करण्यास नकार दिला. नवरीला परिवारातील लोकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती काही तयार झाली नाही. त्यानंतर पंचायत बोलवण्यात आली आणि हुंडा परत देऊन नवरदेवाला घरी जावं लागलं.

ऐचोडा कम्बोह भागातील सकतपुर गावात सतुपुरा गावातून 13 मार्चला वरात आली होती. नवरीकडील लोकांनी वरातीचं जल्लोषात स्वागत केलं. रितीरिवाजांना सुरूवात झाली आणि नवरी-नवरदेव स्टेजवर पोहोचले. वराती जेवण करण्यात आणि डीजेवर नाचण्यात व्यस्त होते. हार घालण्याच्या रिवाजाला सुरूवात झाली. 

यादरम्यान नवरदेवाने अचानक नवरीला उचललं. अचानक झालेल्या या घटनेमुळे नवरी स्टेजवरच संतापली. नवरीकडील लोकांनीही नवरदेवाच्या या वागण्याचा विरोध केला. यावर नवरी इतकी संतापली की, स्टेजवरून निघून गेली. नवरदेव तिला बघतच राहिला.

त्यानंतर नवरीची समजूत काढण्यासाठी घरातील लोक तिच्याजवळ गेले. पण नवरीने लग्न करण्यास नकार दिला. रात्री उशीरापर्यंत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. पण तिने कुणाचं ऐकलं नाही. अशात दोन्हीकडील लोकांमध्ये थोडा वाद झाला.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन्हीकडील लोकांना बोलवून चर्चा केली. पण नवरी लग्नास तयार झाली नाही. अशात नवरदेवाकडील लोकांना हुंडा परत देण्याची मागणी झाली. जेव्हा सगळ्या वस्तू परत देण्यात आल्या तेव्हा नवरीने नवरदेव आणि त्याच्या पाहुण्यांना जाऊ दिलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नJara hatkeजरा हटके