काहीच करत नाही म्हणून कंपनीने काढले, आताही रिकामाच पण वर्षाला कमावतोय ६९ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:11 IST2025-01-10T11:11:21+5:302025-01-10T11:11:37+5:30
तुम्ही म्हणाल त्याने आधी कमविले असतील आता कुठेतरी गुंतविले असतील आणि त्यातून व्याज कमवत असेल. तर तसे नाही. या व्यक्तीला कोरोनापूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये एका कंपनीने तो काहीच करत नाही, कामाचा नाही म्हणून नोकरीवरून काढून टाकले होते.

काहीच करत नाही म्हणून कंपनीने काढले, आताही रिकामाच पण वर्षाला कमावतोय ६९ लाख
आपल्याकडे सांगितले जाते मेहनत केली तर त्याचे फळ मिळते, यश मिळते. काम केले तर चार पैसे मिळतात. पण एका व्यक्तीने हे सर्व दावे खोटे ठरविले आहेत. जपानच्या या व्यक्तीने काहीच न करता वर्षाला ६९ लाख रुपये कमविले आहेत.
तुम्ही म्हणाल त्याने आधी कमविले असतील आता कुठेतरी गुंतविले असतील आणि त्यातून व्याज कमवत असेल. तर तसे नाही. या व्यक्तीला कोरोनापूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये एका कंपनीने तो काहीच करत नाही, कामाचा नाही म्हणून नोकरीवरून काढून टाकले होते. या व्यक्तीने पुढे घरातच बसून दिवस काढले. यानंतर असा जुगाड केला की आताही तो काहीच करत नाही पण वर्षाला ६९ लाख रुपये कमवत आहे.
या व्यक्तीने आपल्यातील काहीच करत नाही, या गुणांचा पुरेपुर वापर केला. तसे पाहिले तर तो काहीच करत नाही. तो फक्त गैर-रोमँटीक पद्धतीने अनोळखी लोकांना कंपनी देतो. हे लोक कंटाळलेले असतात, त्यांच्यासोबत कोणीतरी बोलायला, हसायला हवे असते. अनेकदा एखाद्या कार्यक्रमात सोबत जाण्यासाठी देखील हे लोक त्याला बोलवितात. हा रिकामटेकडा व्यक्ती त्या व्यक्तींना सोबत करतो. बस, याचे ते लोक पैसे मोजतात. यातून त्याची कमाई होते.
मोरिमोटो हा ४१ वर्षांचा आहे. त्याला सात वर्षांचा मुलगा आहे. वर्षाला त्याला कमीतकमी १००० वेळा असे बोलविले जाते. तो या लोकांकडे पैसे मागत नाही, ते लोकच त्यांना वाटतील तेवढे पैसे मोजतात. यापूर्वी तो १० हजार ते ३० हजार येन पर्यंत चार्ज करत होता. आता तो पैसे आकारत नाही. मिळेल तेवढे पैसे घेतो आणि त्यांना साथ देतो. माझ्या चरितार्थासाठी तेवढे पैसे पुरेसे आहेत, असे तो म्हणाले. हे शाश्वत आहे की नाही माहिती नाही. परंतू, याचा मी आनंद घेत आहे, असे त्याने सांगितले.