शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

ऐका हो ऐका! 'काहीच न करण्यासाठी' इथे मिळतोय १.६२ लाख रूपये पगार, तोही आयुष्यभरासाठी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 12:08 PM

बेकार, आळशी आणि बेजबाबदार यांसारख्या शब्दांनी गौरविल्या गेलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विचार करा की, तुम्हाला अशी एक नोकरी मिळेल जिथे तुम्हाला 'काही कामच करावं' लागू नये.

बेकार, आळशी आणि बेजबाबदार यांसारख्या शब्दांनी गौरविल्या गेलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विचार करा की, तुम्हाला अशी एक नोकरी मिळेल जिथे तुम्हाला 'काही कामच करावं' लागू नये. महत्त्वाची बाब म्हणजे या बदल्यात तुम्हाला १.६२ लाख रूपये पगार सुद्धा मिळणार. तसेच वेगवेगळ्या सुट्टी आणि नोकरीशी संबंधित सर्व भत्ते व सुविधाही मिळतील. वाटते ना स्वप्नातील नोकरीसारखी नोकरी. पण तुम्ही म्हणाल अशी नोकरी कशी मिळणार?

इथे आहे ही नोकरी?

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, स्वीडनमध्ये एक एक्सपरिमेंटल आर्ट प्रोजेक्ट सुरू आहे. हा प्रोजेक्ट सरकारकडू फंड केला जात आहे. गोथनबर्ग शहरात ही नोकरी आहे. आश्चर्याची बाब ही आहे की, यासाठी केवळ एकच लकी विनर निवडला जाणार आहे. नोकरी प्रमाणापेक्षा मजेदार आहे. कारण या नोकरीसाठी एका रेल्वे स्टेशनवर रहायचं आहे. सध्या या स्टेशनचं काम सुरू आहे. जर तुम्ही अजूनही याच विचारात असाल की, अशी कशी काहीच काम करता इतक्या पगाराची नोकरी मिळणार? तर त्याची पूर्ण माहिती खालीलप्रमाणे आम्ही सांगतो आहोत.

काय असेल काम?

या एका लकी विनरला दिवसभरात केवळ एकच काम करायचं आहे. या काम सुरू असलेल्या स्टेशनवर एक घड्याळ आहे. करायचं इतकंच आहे की, या घड्याळावरील एका बटनला दाबायचं आहे. याने स्टेशनवरील सर्व फ्लोरोसेंट बल्ब सुरू होतील. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही(कमर्चारी) त्या दिवशी स्टेशनवर होते. एकंदर काय तर हे अटेंडससारखं काम आहे. बाकी यानंतर हा व्यक्ती दिवसभर काहीही करू शकतो. शिफ्ट संपल्यानंतर या व्यक्तीला पुन्हा एकदा घड्याळावरील बटनाला दाबायचं आहे. जेणेकरून बल्ब बंद होतील.

कधीही सोडू शकता नोकरी

आणखी एक मजेदार बाब म्हणजे बटन पंच केल्यावर ही व्यक्ती स्टेशनबाहेरही जाऊ शकते. दिवसभर काहीही करू शकते. इतकेच नाही तर ही व्यक्ती कधीही नोकरी सोडू शकतो. किंवा आपल्या जागी तो दुसऱ्या व्यक्तीलाही कामावर ठेवू शकतो. ही नोकरी आयुष्यभरासाठी मिळणार आहे. या बदल्यात व्यक्तीला महिन्याला २३२० डॉलर इतका पगार दिला जाणार आहे. त्यासोबतच पेंशन फंड, सुट्टी आणि दुसऱ्या सुविधाही मिळणार आहेत.

२०१७ मध्ये मागितल्या होत्या आयडिया

या ड्रिम जॉबची कल्पना २०१७ मध्ये मांडली गेली होती. स्वीडनच्या पब्लिक आर्ट एजन्सी आणि ट्रान्सपोर्ट अॅडमिनिस्ट्रेशनने एका स्पर्धेची सुरूवात केली. यात जगभरातील आर्टिस्टना आयडिया मागितल्या गेल्या. जेणेकरून चांगल्याप्रकारे गोथेनबर्ग स्टेशनला डिझाइन करता यावं. यासाठी ७५०, ००० डॉलरची रक्कम बक्षिस म्हणून ठरवली होती. अनेक आर्टिस्टने आयडिया पाठवल्या, पण सिमोन गोल्डिन आणि जॅकॉब सेनैबीने एक अनोखी आयडिया दिली. त्यांनी आयडिया दिली की, या पैशांमधून एक कर्मचारी ठेवला जावा आणि त्याला आयुष्यभर काहीही काम दिलं जाऊ नये. 

होत आहे टिका

फाऊंडेशनच्या परीक्षकांना ही आयडिया फारच आवडली. नंतर याची घोषणाही करण्यात आली. पण स्वीडनच्या काही भागातून यावर टिकाही करण्यात आली. लोकांचं म्हणणं आहे की, टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या पैशांची ही नासाडी आहे. राजकीय लोकांनीही यावर टिका केली. पण जर तुम्हाला ही नोकरी पसंत असेल तर तुम्हाला सांगतो की, हे स्टेशन २०२६ मध्ये सुरू झाल्यावर कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाईल. तशी या नोकरीची अधिक माहिती पुढील लिंकवरतुम्हाला बघता येईल. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय