शाळेत 'डर्टी पिक्चर' बघणारे मुख्याध्यापक निलंबित

By Admin | Updated: July 6, 2014 18:39 IST2014-07-06T18:38:23+5:302014-07-06T18:39:33+5:30

उत्तरप्रदेशमधील एका शाळेत मुख्याध्यापक बघणा-या मुख्याध्यापकाला निलंबीत केल्याची घटना समोर आली आहे.

Suspended headmaster watching school 'Dirty Picture' | शाळेत 'डर्टी पिक्चर' बघणारे मुख्याध्यापक निलंबित

शाळेत 'डर्टी पिक्चर' बघणारे मुख्याध्यापक निलंबित

 

ऑनलाइ टीम
मथुरा, दि. ६- उत्तरप्रदेशमधील एका शाळेत मुख्याध्यापक बघणा-या मुख्याध्यापकाला निलंबीत केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे याच मुख्याध्यापकांनी शाळेतील काही कर्मचारी सरकारी कॉम्प्यूटरवर पॉर्न बघत असल्याची तक्रार केली होती. मात्र तपासात मुख्याध्यापक स्वतःच पॉर्न बघत होते हे निष्पन्न झाले व त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. 
मथूरा येथील पानीगाव येथील शाळेचे मुख्याध्यापक महावीर प्रसाद यांनी शाळेतील कॉम्प्यूटर शिक्षकाविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. कॉम्प्यूटर शिक्षक शाळेच्या कॉम्प्यूटरवर पॉर्न बघत बसतात असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शिक्षण विभागाच्या पथकाने शाळेतील संगणकांचा रेकॉर्ड तपासून बघितला. यात कॉम्प्यूटर शिक्षक पॉर्न बघत असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही पण स्वतः मुख्याध्यापक मात्र पथकाच्या जाळ्यात अडकले. कॉम्प्यूटर शिक्षकाच्या मोबाईलवर मुख्याध्यापकच पॉर्न बघतानाचा व्हिडीओ आढळला. मुख्याध्यापकांविरोधात भक्कम पुरावा मिळाल्याने जिल्हाधिका-यांनीही या मुख्याध्यापकांसह दोन शिक्षक आणि कॉम्प्यूटर शिक्षक अशा चौघांना निलंबीत केले. या सर्वांवर सायबर अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल असे अधिका-यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Suspended headmaster watching school 'Dirty Picture'