विद्यार्थ्याचा कारनामा! परीक्षेत लिहिलं I LOVE MY POOJA; शिक्षकाला दिल्या 100-100 च्या नोटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:02 IST2022-11-22T12:54:37+5:302022-11-22T13:02:19+5:30
परीक्षेत प्रश्नांची उत्तरे न आल्याने विद्यार्थ्यांनी विचित्र गोष्टी लिहिल्या आहेत. एका विद्यार्थ्याने त्याच्या पेपरमध्ये त्याची प्रेमकथा लिहिली.

विद्यार्थ्याचा कारनामा! परीक्षेत लिहिलं I LOVE MY POOJA; शिक्षकाला दिल्या 100-100 च्या नोटा
शाळा-कॉलेजमध्ये असे काही विद्यार्थी असतात जे वर्षभर मौजमजा करतात. परीक्षेची वेळ येताच अभ्यास करण्याऐवजी उत्तरपत्रिकेत चुकीच्या गोष्टी लिहितात. त्याचप्रमाणे काही विद्यार्थी पेपरमध्ये अशा गोष्टी लिहितात ज्या नंतर खूप व्हायरल होतात. सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. आता ही असाच फोटो तुफान व्हायरल झाला असून आता जोरदार चर्चा रंगली आहे.
परीक्षेत प्रश्नांची उत्तरे न आल्याने विद्यार्थ्यांनी विचित्र गोष्टी लिहिल्या आहेत. एका विद्यार्थ्याने त्याच्या पेपरमध्ये त्याची प्रेमकथा लिहिली. त्याने मोठ्या अक्षरात 'I LOVE MY POOJA' असे लिहिले आहे. विद्यार्थ्याने पेपरमध्ये कविता लिहिली, 'हे काय प्रेम आहे, ना जगू देते ना मरू देते. यासाठी प्रार्थना करा, जर मला ते मिळाले नाही तर मी मरेन.' यासोबतच त्याने प्रेमावरच्या अनेक कविता लिहिल्या.
शेवटी विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिले, "सर, या प्रेमकथेने मला अभ्यासापासून दूर केले. नाहीतर मी हायस्कूलपर्यंत खूप मेहनत घेतली. सर हे लिहिल्याबद्दल खूप खेद वाटतो." पेपर तपासणाऱ्या शिक्षकाने हे पाहताच त्याचा फोटो काढला आणि पेपरवर लाल रेषा काढली. आता हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. असाच आणखी एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका विद्यार्थ्याने चांगले मार्क्स मिळावेत पेपरच्या मधोमध 100-100 च्या दोन-तीन नोटा टाकल्या आहेत.
एका विद्यार्थ्याने शिक्षकासाठी शंभरच्या नोटा ठेवल्या आणि परीक्षेत पास व्हावे म्हणून शिक्षकाला लाच देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याला आपण पास होऊ शकणार नाही असे वाटल्याने त्याने शिक्षकांना पैसे देऊन पास होण्याची विनंती केली. मात्र, शिक्षकाने त्याचा फोटो क्लिक केला आणि तो आता व्हायरल झाला आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थी असे कृत्य करतात आणि नंतर व्हायरल होतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"