शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ना प्रेग्नेन्सीची लक्षणं ना बेबी बंप, पोट दुखलं म्हणून हॉस्पिटल गेली अन् बाळ घेऊन आली विद्यार्थीनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 17:51 IST

एक दिवस अचानक पोटात दुखू लागल्याने एली हॉस्पिटलमध्ये गेली आणि तेव्हा तिला डॉक्टरांनी जे सांगितलं जे ऐकून तिला धक्का  (Pregnancy Complications) बसला.

(Image Credit : mirror.co.uk)

प्रेग्नेन्सी आणि आई होण्याची वाट प्रत्येक महिला बघत असते. हे सगळं प्लानिंग करून केलं आणि त्यानुसार सगळं झालं तर ठीक नाही तर याचं सरप्राइज मिळालं तर समस्या निर्माण होऊ शकते. असंच काहीसं झालं एली जॉनसन (Ellie Johnson) नावाच्या विद्यार्थिनीसोबत. तिला प्रेग्नेन्सीच्या ९ महिन्यांपर्यंत हे माहीत नव्हतं की, तिच्या पोटात बाळ वाढत आहे.

एक दिवस अचानक पोटात दुखू लागल्याने एली हॉस्पिटलमध्ये गेली आणि तेव्हा तिला डॉक्टरांनी जे सांगितलं जे ऐकून तिला धक्का  (Pregnancy Complications) बसला. एली अजिबात कल्पना नव्हती की, ती प्रेग्नेंट आहे. पण तेव्हा हॉस्पिटलमधून घरी परतली तेव्हा ती एका गोंडस मुलीला सोबत घेऊन गेली.

ब्रिटनच्या एसेक्समध्ये राहणारी एली जॉनसननुसार, तिच्या ३ प्रेग्नेन्सी टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. तसेच ती प्रेग्नेन्सी टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचंही सेवन करत होती. तिच्या पोटात बाळ आहे हे माहीतच नसल्याने तिने ९ महिन्याच्या प्रेग्नेन्सी दरम्यानही गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या होत्या. यादरम्यान तिला वेगळं असं काहीच जाणवलं नाही आणि ना तिला प्रेग्नेन्सीची काही लक्षणं दिसली. इतकंच तर तिला बेबी बंपही दिसत नव्हतं.

Mirror च्या रिपोर्टनुसार, एलीला पहिल्यांदा ऑगस्ट २०१८ मध्ये विचित्र वाटल होतं. तिला वाटलं की, तिच्या शरीरात जणू सगळं थांबलंय. त्यानंतर २० डिसेंबरला तिने अल्ट्रासाउंड टेस्ट केली. पण त्यात काहीच आढळलं नाही. मग दिवस ती तिच्या आजीच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर झोपायला गेली तेव्हा तिच्या पोटात आणि पाठीत दुखू लागलं होतं. रात्री उशीरा २ वाजता तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे तिला टॉयलेटमध्ये विचित्र जाणवलं आणि नर्सने तिला पाहिलं तर ती लेबर पेनमध्ये होती. काही वेळातच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यावेळी तिला फार आनंद झाला नाही. पण नंतर मग ती बाळाचं तोंड बघून तिच्या प्रेमात पडली. 

टॅग्स :LondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीयPregnancyप्रेग्नंसीJara hatkeजरा हटके