मांजरांसाठी  खास रेल्वे  ​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:11 IST2017-09-13T01:11:12+5:302017-09-13T01:11:12+5:30

जपानमधील लोक मांजरांवर अतिशय प्रेम करतात. आता हेच पाहा ना त्यांनी खास मांजरांसाठी एक रेल्वे सुरु केली. ‘कॅट कॅफे’नावाच्या या रेल्वेत पहिल्याच दिवशी ३० मांजरी आणि ४० प्रवासी होते.

 Special train for cats | मांजरांसाठी  खास रेल्वे  ​​​​​​​

मांजरांसाठी  खास रेल्वे  ​​​​​​​

जपानमधील लोक मांजरांवर अतिशय प्रेम करतात. आता हेच पाहा ना त्यांनी खास मांजरांसाठी एक रेल्वे सुरु केली. ‘कॅट कॅफे’नावाच्या या रेल्वेत पहिल्याच दिवशी ३० मांजरी आणि ४० प्रवासी होते. यावेळी प्रवासी मांजरांसोबत खूप खेळले. फोटो काढले आणि या प्रवासाचा आनंद घेतला. 
योरो रेल्वे कंपनी लिमिटेड आणि एका बिगर सरकारी संघटनेने रेल्वेच्या या विशेष फेरीचे आयोजन केले होते. जपानमध्ये अलीकडच्या काळात मांजरांच्या हत्या वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मांजरांचा हा प्रवास अर्धा तास चालला.         


 

Web Title:  Special train for cats