नवा फोटो शेअर करत स्मृती इराणी म्हणाल्या, "तुमच्या विजयाची खात्री करा," एकता कपूरनंही केलं कमेंट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 13:31 IST2022-05-06T13:31:15+5:302022-05-06T13:31:34+5:30

त्यांनी आपल्या फोटोसह एक छान कॅप्शन दिलं आहे.

smriti irani post new pic with a powerful message on instagram post ekta kapoor comments | नवा फोटो शेअर करत स्मृती इराणी म्हणाल्या, "तुमच्या विजयाची खात्री करा," एकता कपूरनंही केलं कमेंट..

नवा फोटो शेअर करत स्मृती इराणी म्हणाल्या, "तुमच्या विजयाची खात्री करा," एकता कपूरनंही केलं कमेंट..

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक नवीन फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत त्यांनी एक अनोखं कॅप्शनही शेअर केले आहे. स्मृती इराणी यांनी स्वतःचा एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही गुरु गोविंद सिंग यांचे छायाचित्र देखील पाहू शकता.

त्यांनी या फोटोसह एक कॅप्शनही दिलं आहे. "तुमच्या विजयाची खात्री करा," असं त्यांनी या फोटोसह लिहिलं आहे. याशिवाय त्यांनी फोटोसह #gurusangat हा हॅशटॅग दिला आहे. "दृढ संकल्पासह मी विजय होणारच," असा याचा अर्थ आहे.


त्यांच्या या फोटोवर एकता कपूर (Ekta Kapoor) हिनंदेखील हार्ट इमोजीसह कमेंट केलं आहे. तर दुसरीकडे एका युझरनं त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांचं कौतुक केलं. "गुरू गोविंदसिंग यांनी खुप चांगलं सांगितलं आहे... टिव्हीवरून तुमचा मोठा फॅन... तुमचा प्रवास अविश्वसनीय आहे," असं एका युझरनं लिहिलं आहे.

Web Title: smriti irani post new pic with a powerful message on instagram post ekta kapoor comments