शीखांनी जमविले तीन लाख डॉलर्स

By Admin | Published: May 22, 2014 02:59 AM2014-05-22T02:59:21+5:302014-05-22T14:59:39+5:30

मेरिकेच्या एका शीख संघटनेने पंजाबच्या गरजू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी ३,३०,००० डॉलरचा निधी उभारला आहे

Sikhs raise three hundred thousand dollars | शीखांनी जमविले तीन लाख डॉलर्स

शीखांनी जमविले तीन लाख डॉलर्स

googlenewsNext

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या एका शीख संघटनेने पंजाबच्या गरजू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी ३,३०,००० डॉलरचा निधी उभारला आहे. निधी उभारण्याच्या या कार्यक्रमाची सुरुवात शीख ह्यूमन डेव्हलपमेंट फाऊंडेशनने केली. या कार्यक्रमात अमेरिकेत राहणार्‍या शीखांनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथीच्या रूपात दुबईचे उद्योगपती सुरेंद्र सिंह कंधारी उपस्थित होते. कंधारी यांनी एक लाख डॉलर निधीची घोषणा केली. ते म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महत्त्वपूर्ण संपत्ती आहे. संस्थेचे अध्यक्ष गजिंदर सिंह आहुजा म्हणाले की, या निधीतून तब्बल ११०० जणांनी उच्च शिक्षण घेतले. ते सर्व जण चांगल्या पदावर कार्यरत आहेत.

Web Title: Sikhs raise three hundred thousand dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.