शूऽऽऽ! इथे गॉसिप करताना दिसलात तर होणार शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 01:33 AM2019-05-12T01:33:47+5:302019-05-12T01:33:58+5:30

माणसाच्या स्वभावामध्ये गॉसिप करणे सवयीचं झालंय, कधीही कोणती घटना घडली तर गॉसिप केलं जातं. घरापासून आॅफिसपर्यंत, रस्त्यावरुन संसदेपर्यंत, कानाकोपऱ्यात गॉसिप केलं जातं.

 Shu! If you look at gossip here, you will get education | शूऽऽऽ! इथे गॉसिप करताना दिसलात तर होणार शिक्षा

शूऽऽऽ! इथे गॉसिप करताना दिसलात तर होणार शिक्षा

Next

माणसाच्या स्वभावामध्ये गॉसिप करणे सवयीचं झालंय, कधीही कोणती घटना घडली तर गॉसिप केलं जातं. घरापासून आॅफिसपर्यंत, रस्त्यावरुन संसदेपर्यंत, कानाकोपऱ्यात गॉसिप केलं जातं.
अफवांचे कारणही गॉसिप आहे. या कारणामुळे एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. फलिपिन्ससमधील बिनलोनन मध्ये प्रशासनाने गॉसिपवर बंदी आणली आहे. त्यामुळे जर याठिकाणी तुम्ही गॉसिप कराल तर तुम्हाला शिक्षेला सामोरे जावे लागेल.
या कायद्यामुळे लोकांमध्ये आपण काय बोलतो याचं भान राहील असं प्रशासनकडून सांगण्यात येत आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय बोलतो याचे भान राखायला हवं यासाठी कायदा बनवला आहे.
या कायद्यातंर्गत जर तुम्ही गॉसिप करताना पकडले गेलात तर पहिल्यांदा तुम्हाला ७२१ रुपयांचा दंड होईल. त्याचसोबत तीन तासांसाठी रस्त्यावरील कचरा उचलण्याची शिक्षा केली जाईल.

जर दुसऱ्यांदा तुम्ही हा कायदा मोडला तर १४00 रुपये दंड
0८ तासांसाठी सामाजिक सेवा करण्याची शिक्षा दिली जाणार आहे.
मात्र अद्याप या कायद्यातंर्गत गॉसिप नेमकं कशाला मानलं जाणार हे मात्र अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

Web Title:  Shu! If you look at gossip here, you will get education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.