'या' ठिकाणी मिळते गर्लफ्रेण्ड भाड्याने, फक्त मानावी लागेल 'ही' अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 19:29 IST2018-03-31T16:50:59+5:302018-03-31T19:29:56+5:30

तुम्हाला थोडा खर्च करवा लागेल तसंच एक अटही मानावी लागेल.

shopping centre in southern china offers girlfriends on rent but with a condition | 'या' ठिकाणी मिळते गर्लफ्रेण्ड भाड्याने, फक्त मानावी लागेल 'ही' अट

'या' ठिकाणी मिळते गर्लफ्रेण्ड भाड्याने, फक्त मानावी लागेल 'ही' अट

हुआन- जर तुम्ही सिंगल आहात आणि कुठली मुलगी फार भाव देत नसेल तर फार चिंता करू नका. कारण एक असं ठिकाण आहे जिथे गर्लफ्रेण्ड चक्क भाड्याने मिळते. पण त्यासाठी तुम्हाला थोडा खर्च करवा लागेल तसंच एक अटही मानावी लागेल. ती अट म्हणजे त्या मुलीला तुम्ही जरासुद्धा स्पर्श करू शकत नाहीत. 

दक्षिण चीनमधील हुआनमध्ये असलेल्या एका शॉपिंग सेंटरमध्ये 15 मुली आहेत. वाइटॅलिटी सिटी शॉपिंग कॉम्पेक्सच्या प्रवेशद्वारावर या मुली उभी असलेल्या पाहायला मिळतात. त्यापैकी एका मुलीची निवड तुम्हाला करता येईल. त्यासाठी तुम्हाला 13 रूपये 75 पैसे  (11p - फिलिपीनो पीसो) मोजावे लागतील. या पैशात तुम्हाला तुम्ही निवडलेल्या मुलीबरोबर 20 मिनिटांचा वेळ घालवता येईल. यादरम्यान तुम्ही त्या मुलीला शॉपिंग करायला किंवा लंच-डिनर नेऊ शकता. 

हुआनमध्ये सध्या मुलांमध्ये याची खूप क्रेझ आहे. हा नवा शॉपिंग ट्रेंड बनेल असा दावा शॉपिंग सेंटर करतं आहे. 
 

Web Title: shopping centre in southern china offers girlfriends on rent but with a condition