शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

OMG! काही न खाता-पिता १० दिवस झाडावर राहिलं कपल, खतरनाक अस्वलाने तरी सोडला नाही पिच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 5:37 PM

सायबेरियाच्या Kamchatka भागात Anton आणि Nina Bogdanov नावाच्या कपलने लग्नानंतर एडव्हेंचरसाठी जंगलात एक रात्र घालवण्याचा प्लॅन केला होता.

रशियात फिरण्यासाठी गेलेल्या एका कपलला जंगली अस्वलापासून आपला जीव वाचवण्यासाठी १० दिवसांपर्यंत उपाशी एका झाडावर रहावं लागलं. पण तरीही अस्वलाने त्यांना पिच्छा सोडला नाही आणि त्यांची शिकार करण्यासाठी झाडाखाली बसून राहिला. या घटनेनंतर पती-पत्नी दोघेही घाबरलेले आहेत. 

सायबेरियाच्या Kamchatka भागात Anton आणि Nina Bogdanov नावाच्या कपलने लग्नानंतर एडव्हेंचरसाठी जंगलात एक रात्र घालवण्याचा प्लॅन केला होता. जंगलात जात असताना त्यांची गाडी एका खड्ड्यात अडकली. जंगलात मोबाइल नेटवर्क नसल्याने ते मदतीसाठी कुणाला बोलवूही शकले नाहीत. त्यांनी मदतीसाठी त्यांच्या विंडस्क्रीनवर एक मेसेज लिहिला होता. पण त्यांनी सांगितलं की, त्यांचा शोध घेण्यासाठी कुणी आलं नाही. (हे पण वाचा : जीव मुठीत घेऊन झाडावर ८ तास बसून राहिला, खाली फिरत होते दोन वाघ; वाचा थरारक अनुभव)

त्यांनी सांगितलं की, त्यांनी तेथून Banniye Springs च्या टूरिस्ट बेसवर जाण्याचा निर्णय घेतला. ते जसजसे पुढे जात राहिले त्यांच्यामागे एक अस्वल येत होता. त्यांनी अस्वलाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पण तो नंतर कपलच्या मागे धावत येऊ लागला होता. कसंतरी कपल काही अंतरावर गेल्यावर एका झाडावर चढलं.  

नीनाने सांगितलं की,एक वेळ अशी आली होती की, अस्वलाने जवळजवळ तिच्या पतीचा जीव घेतलाच होता. पण तिने बॉटल फेकून त्याचं लक्ष्य विचलित केलं आणि पती झाडावर चढला. त्यांनी जवळपास २ दिवस त्या झाडावर काढले आणि ते अस्वल त्यांच्यावर सतत नजर ठेवून तिथंच होतं. (हे पण वाचा : कुत्र्यांना मिळाली मृत्यूदंडाची शिक्षा, शेजाऱ्याला चावले म्हणून जीव देऊन चुकवावी लागली किंमत!)

अस्वलाने केला पाठलाग

नीनाने सांगितलं की, यानंतर अस्वलाने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्यांच्या खाण्याच्या वस्तू असलेली बॅग त्याच्यावर फेकली. ही आयडिया कामी आली. अस्वलाने बॅगेतील पदार्थ खाल्ले. त्यांनी दोन दिवसांनी त्या झाडावरून उतरून नदीच्या दुसऱ्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. ते जसे नदी पार करून गेले अस्वव पुन्हा त्यांच्या मागे लागलं. त्यांनी पुन्हा एकदा झाडाचा आधार घेतला.

झाडावर १० दिवस

कपलने सांगितलं की, परिस्थिती अशी होती की, अस्वल त्यांची खाली उतरण्याचीच वाट बघत होते. अशात दोघांपैकी एक जण झोपत होतं तर दुसरा जागी राहत होता. त्यांनी एका झाडाहून दुसऱ्या झाडावर चढत साधारण १० दिवस काढले. त्यांच्याकडे खाण्यासाठी काही नव्हतं आणि जंगलात थंडीही खूप होती. १० दिवस वाट पाहिल्यावर अखेर अस्वलाने हार मानली आणि तो निघून गेला. त्यानंतर कपल कसंतरी आपल्या गाडीजवळ पोहोचलं. तिथे त्यांना काही गाड्या दिसल्या आणि रेस्क्यू टीमही. त्यांना बघून त्यांच्या जीवात जीव आला.  

टॅग्स :russiaरशियाJara hatkeजरा हटके