शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

#SHOCKING : रस्त्यावर भीक मागणारा गेला विमानातून घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 13:06 IST

रस्त्यावर भिक मागून आपल्या पोटाची भूक भागवणारा एक व्यक्ती थोड्याच वेळात विमानाने आपल्या घरी परत गेला.

ठळक मुद्देमुळची करोडपती असलेली व्यक्ती रस्त्यावर चक्क भीक मागताना आढळल्याची घटना समोर आली आहे.या व्यक्तीला एका महाराजांनी चांगलं जेवण दिलं आणि त्यांची अंघोळ वगैरे घातली.त्यांचे केस कापल्यानंतर काही लोकांना त्यांची खरी ओळख पटली.

लखनऊ : आपण मध्यंतरी एक बातमी वाचली की, एक करोडपती व्यवसायिक त्याचा व्यवसाय बुडाल्याने एका बेटावर जाऊन राहतोय. असाच एक प्रकार लखनऊमध्ये समोर आलाय. करोडपती असलेली व्यक्ती रस्त्यावर चक्क भीक मागताना आढळली. मात्र जेव्हा या व्यक्तीची ओळख पटली तेव्हा तो इसम विमानाने आपल्या घरी गेला. 

उत्तरप्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यातील कस्बे रोडववर एक व्यक्ती भीक मागताना एका महाराजांना दिसली. स्वामी भास्कर स्वरुप या महाराजांनी त्या इसमाची जेवणाची व्यवस्था केली. जेवण झाल्यानंतर त्या इसमाला स्वच्छ करण्यात आलं. त्यांना अंघोळ घालण्यात आली, त्यांचे केस कापण्यात आले. त्यांचे कपडे धुवताना मंदिरातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या खिशात आधार कार्ड आणि एफडीचे कागदपत्रे सापडले. त्यांची एफडी पाहूनच सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यांच्या एफडीवर चक्क १ कोटी ७ लाख रुपये होते. 

आणखी वाचा - एकेकाळी करोडपती असलेला हा इसम आता झाला संन्यासी आणि राहतो बेटावर

आधार कार्डच्या माहितीनुसार ही वृद्ध व्यक्ती तामिळनाडूच्या थिरुवनावली येथे राहणारे होते. त्यांचं नाव मुथैया नादर असं आहे. मुळात ते भिकारी नसून करोडपती आहेत. त्यांच्या आधारकार्डच्या माहितीनुसार त्यांच्या घरच्यांचा पत्ता शोधण्यात आला. पत्ता शोधताना त्यांच्या मुलीशी संपर्क झाला. मुलीनं लगेच तामिळनाडूतून लखनऊला येऊन आपल्या वडिलांना ओळखलं. 

त्यांच्या मुलीनं दिलेल्या माहितीनुसार, ‘सहा महिन्यांपूर्वी तिचे वडिल तीर्थ यात्रेसाठी निघाले होते. मात्र त्यानंतर त्यांचा काहीच संपर्क होऊ शकला नाही. त्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडण्यात आलं. मात्र तरीही ते सापडले नाही. पण आता सहा महिन्यांनी त्यांना सुखरूप पाहून मी आनंदित झाली आहे.’ एवढ्या महिन्यांनंतर वडिलांना सुखरूप पाहून तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. वडिलांशी संपर्क करून दिल्यामुळे तिनं स्वामी आणि मंदिरातील इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. रस्त्यावर खितपत पडलेला हा व्यक्ती घरी जाताना मात्र ऐटीत विमानात बसून गेला. 

टॅग्स :IndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेश