शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

Shocking: २४० वर्ष जुनं 'सीक्रेट पेज' झालं व्हायरल; ब्रिटीशांनी लिहिल्या होत्या या गोष्टी, तुम्ही वाचलंत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 16:26 IST

बऱ्याच लोकांना जुन्या गोष्टी पाहिल्यावर काही आठवणी डोळ्यासमोर येतात...

Old Photo Of British Diary: आपल्या सर्वांना माहित आहे की, भूतकाळ बहुतेक लोकांसाठी खूप क्लिष्ट असू शकतो. यापैकी काही गोष्टी नॉस्टॅल्जिया आणि काही आठवणी, भावना जागृत करू शकतात. पुरातन वास्तू आपल्याला भूतकाळाशी जोडल्याची भावना देतात आणि पूर्वीच्या काळात लोक कसे जगायचे, विचार कसे करायचे हे समजून घेण्यास मदत करू शकतात. अलीकडे, लेखिका इरा मुखोती यांनी बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांच्या वैयक्तिक डायरीतील एक दस्तावेज शेअर केला आहे. जाणून घ्या काय होतं त्या दस्तावेजात...

वॉरन हेस्टिंग्जच्या वैयक्तिक डायरीतील कबाब रेसिपी

इरा यांनी कबाब रेसिपीचा (Kebab Recipe) जुना फोटो शेअर केला आहे. कबाबच्या रेसिपीचा फोटो ट्विटरवर शेअर करत त्यांनी त्यासोबत एक छोटासा मेसेजही लिहिला आहे. फोटोमध्ये, एक हाताने लिहिलेली नोट आपण पाहू शकतो ज्यामध्ये कबाबसाठीचे लागणारे साहित्य, जसे की किसलेले मांस, लसूण, मिरची, अंड्यातील पिवळ बलक, मलई आणि बरेच काही लिहिले आहे. वॉरन हेस्टिंग्जनेही डिश बनवण्याच्या प्रक्रियेची नोंद केली आहे. जसे तुम्ही वॉरन हेस्टिंग्जच्या कबाब रेसिपीमध्ये लिहिलेले बघू शकता- "पाच किंवा सहा ग्लास पाण्यात कबाब चांगले मिसळा, सॉसपॅनमध्ये कोरडे होईपर्यंत उकळवा. दगडावर चांगले दळून घ्या. त्याचे केकसारखे आकार बनवा आणि बटर फ्राय करा.  हे करताना पॅनला पदार्थ चिकटणार नाही याची काळजी घ्या," असे त्यात लिहिले आहे.

--

ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

इराने ट्विटमध्ये पुढे म्हटले- "त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित होणार असतानाही, हेस्टिंग्ज जुलै १७८४ मध्ये लखनौमध्ये नवाब आसफ यांच्या सहवासात एन्जॉय करत होते, कबाब बनवायला शिकत होते. ब्रिटिश लायब्ररी, हेस्टिंग्जची वैयक्तिक डायरी पाहून हे समजू शकते." हा फोटो शेअर केल्यापासून, या ट्विटला आतापर्यंत एक लाख ७३ हजार व्ह्यूज आणि १४०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इंटरनेट वापरकर्त्यांना कबाब रेसिपीच्या या जुन्या नोटांबद्दल खूप रस होता. एका वापरकर्त्याने लिहिले, "ही कागदपत्रे उत्तम माहिती देणारी आहेत. त्यावर 'कबाब खेताई' लिहिलेले आहे का?" असेही एकाने लिहिले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया