शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

43 वर्षात केली 53 लग्नं, एक तर काही तासच टिकलं; हैराण करणारं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 09:35 IST

Saudi Arab Abu Abdullah Marriage : सौदी अरबमध्ये राहणारा 64 वर्षीय अबू अब्दुल्ला आपल्या लग्नांमुळे चांगलाच चर्चेत आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, अबूने 43 वर्षात एकूण 53 लग्ने केली आहेत. 

Saudi Arab Abu Abdullah Marriage : लग्न ही आयुष्यातील एक आनंद देणारी आणि महत्वाची घटना असते. प्रत्येक कपलला वाटत असतं की, त्यांच्यातील प्रेम सतत कायम रहावं आणि त्यांचा सुखी संसारही कायम रहावा. अशात तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, काही लोक 2 किंवा 3 किंवा 4 लग्ने करतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याने आतापर्यंत 53 लग्ने केली. नवीन बाब अशी आहे की, तो आता पुन्हा पुन्हा लग्न करून कंटाळला आहे आणि यामुळे त्याने एक घोषणा केली आहे जी हैराण करणारी आहे.

अबू अब्दुल्लाचा किस्सा

सौदी अरबमध्ये राहणारा 64 वर्षीय अबू अब्दुल्ला आपल्या लग्नांमुळे चांगलाच चर्चेत आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, अबूने 43 वर्षात एकूण 53 लग्ने केली आहेत. 

अबूने इंटरव्ह्यू सोशल मीडियावर नेहमीच  व्हायरल होत असतात. काही दिवसांआधी त्याने मीडियासोबत बोलताना सांगितलं होतं की, त्याने 53वं लग्न केवळ मन झालं म्हणून किंवा संबंध ठेवण्यासाठी केलेलं नाही. जीवनात संतुलन आणि डोक्याला शांतता मिळण्यासाठी केलं. अबूनुसार, इतक्या लग्नांचा उद्देश केवळ आपल्यासाठी अशी लाइफ पार्टनर शोधणं होतं, जी त्याला आनंदी ठेवेल आणि सोबतच समजूनही घेईल.

कधी झालं होतं पहिलं लग्न

अबूचं पहिलं लग्न घरच्यांच्या सहमतीने तो 20 वर्षाचा असताना झालं होतं. त्याची पहिली पत्नी वयाने त्याच्यापेक्षा मोठी होती. दोघेही संसारात आनंदी होते. अबूनुसार, काही दिवसांनी त्यांच्या नात्याला कुणाचीतरी दृष्ट लागली आणि अबूने दुसरं लग्न केलं. नंतरही काही जमलं नाही म्हणून तिसर लग्न केलं. अशाप्रकारे लग्नांचा हा सिलसिला सुरूच राहिला. अबूने सांगितलं की, ही लग्ने त्याने प्लान करून केली नाहीत. आपल्या पत्नींना वैतागून दरवेळी त्याला मजबुरीत हा निर्णय घ्यावा लागला.

अबूने सांगितलं की, त्याच्या लग्नाचा सगळ्यात कमी कालावधी वन नाइट इव्हेंट होता. तो म्हणाला की, माझं एक लग्न तर केवळ 8 तासच टिकलं. अचानक नवरीच्या एका गोष्टीने त्याला इतका राग आला की, त्याने लग्नाच्या रात्रीच पत्नीला घटस्फोट दिला. 

अबूने सांगितलं की, त्याची जास्तीत जास्त लग्ने सौदी महिलांसोबत झाली आहेत. त्याने सांगितलं की, मी एक व्यावसायिक आहे. कामानिमित्त मला जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये जावं लागतं. काही वाईट होऊ नये म्हणून दुसऱ्या देशांच्या दौऱ्यावर असताना मी परदेशी महिलांसोबतही लग्ने केली. याचा एक फायदा झाला की, मला त्या देशांमध्ये कायदेशीर गोष्टींच्या अडचणी आल्या नाहीत.

43 वर्षात 53 लग्नांनंतर आता अबू केवळ एकाच महिलेसोबत आहे आणि त्याने आता ही घोषणा केली आहे की, भविष्यात त्याचा नवं लग्न करण्याचा कोणताही विचार नाही.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाmarriageलग्नJara hatkeजरा हटके