शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार
2
‘नीट’ निकालाची सीबीआय चौकशी करा, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह ‘आयएमए’ची देखील मागणी
3
तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला
4
विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास 
5
केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा
6
गो-फर्स्टची तारण जमीन विकून होणार, केवळ ५० टक्क्यांचीच वसुली
7
शिंदे, फडणवीस, पवार यांची नवी दिल्लीत पटेल यांच्या निवासस्थानी बैठक
8
एअर इंडिया - विस्ताराचे विलीनीकरण अखेर मार्गस्थ
9
इस्रायलचा मध्य गाझामध्ये हवाईहल्ला; ४० पॅलेस्टाइन नागरिक ठार, १८ लहान मुलांचा समावेश
10
विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...
11
हुथी बंडखोरांची मुजोरी! सागरी हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या ९ कर्मचाऱ्यांना बनवले बंदी
12
मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू
13
शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा
14
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
15
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
16
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
17
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
18
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...
19
जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video 
20
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."

Sadio Mane’s broken Mobile: अब्जो रुपये कमावणारा फुटबॉलर वापरतो तुटलेला मोबाइल? फोटो व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 4:48 PM

स्टार फुटबॉलर सादियो मानेच्या तुटलेल्या फोनमागची गोष्ट ऐकून तुम्हीही त्याचे कौतुक कराल.

Sadio Mane’s broken Mobile: पश्चिम आफ्रिकन देश सेनेगलचा स्टार फुटबॉलपटू सॅडियो मानेचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो अडीच वर्षे जुना आहे, पण आजही फोटो पाहून नेटकरी चकीत होतात. कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या या खेळाडूच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोत फुटबॉलर सादियो माने हातात स्क्रीन तुटलेला iPhone 11 मोबाईल धरलेला दिसतोय. हा फोटो डिसेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा समोर आला होता. त्यावेळी सादियो मानेची कमाई कोट्यवधी रुपये होती. आजही तो कोट्यावधी रुपये कमावतो. कोट्यवधी रुपये कमावणारा फुटबॉलपटू तुटलेला मोबाइल घेऊन का फिरतोय, याचा अनेकांना धक्का बसला. 

अडीच वर्षांपूर्वी हा फोटो समोर आला, तेव्हाही सादियो मानेला हाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने दिलेल्या उत्तराने अनेकांचे डोळे पानावले होते. तुम्ही याचे कारण ऐकले तर तुम्हीही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. मूळात सादियो माने फोनपेक्षा आपल्या देशातील गरिबांकडे जास्त लक्ष देतो. एका मुलाखतीत सदियो माने तुटलेल्या मोबाईलबद्दल म्हणाला होता, 'मी असे हजार मोबाईल घेऊ शकतो. पण, मला याची गरज वाटत नाही. मी गरिबी पाहिली आहे, मला शाळेत जाता आले नाही. यामुळेच मी इतर वस्तुंवर पैसे खर्च करण्यापेक्षा माझ्या देशातील मुलांसाठी शाळा आणि फुटबॉल स्टेडियम बांधले आहेत.

साडिओ लिव्हरपूलचा महत्त्वाचा खेळाडू इंग्लिश क्लब लिव्हरपूलसाठी सॅडिओ माने हा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने क्लबसाठी 269 सामन्यात 120 गोल केले. सॅडिओ मानेच्या नेतृत्वाखाली इंग्लिश क्लब लिव्हरपूलने 2018-19 मध्ये चॅम्पियन्स लीग आणि 2019-20 मध्ये इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले. साडिओने या वर्षी जर्मन क्लब बायर्न म्युनिचसोबत सुमारे 330 कोटी रुपयांचा (40 दशलक्ष युरो) तीन वर्षांचा करार केला आहे. 

टॅग्स :FootballफुटबॉलSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके