सचिन पहिला सामना खेळला पाकिस्तानकडून, तेही भारताविरुद्ध
By Admin | Updated: November 8, 2014 10:44 IST2014-11-08T10:31:50+5:302014-11-08T10:44:09+5:30
अधिकृतरीत्या सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरोधात भारताच्या टीममध्ये १९८९मध्ये पदार्पण केलं. परंतु, गमतीचा भाग म्हणजे सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिल्डर

सचिन पहिला सामना खेळला पाकिस्तानकडून, तेही भारताविरुद्ध
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - अधिकृतरीत्या सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरोधात भारताच्या टीममध्ये १९८९मध्ये पदार्पण केलं. परंतु, गमतीचा भाग म्हणजे सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिल्डर म्हणून मैदानार आला दोन वर्षांपूर्वी ते ही पाकिस्तानच्या टीममधून भारताच्या विरोधात. सचिनच्या पुस्तकात अदभुत योगायोगाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
पाकिस्तान १९८७ मध्ये भारताच्या दौ-यावर आला होता. त्यावेळी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान असा प्रदर्शनीय सामना रंगला होता. इम्रान खान कप्तान असताना लंचनंतर कादीर व मियाँदाद क्षेत्ररक्षणासाठी उतरले नाहीत आणि त्यांनी स्थानिक खेळाडुंनी बदली म्हणून क्षेत्ररक्षण करण्याची विनंती केली. यामध्ये एक खेळाडू सचिन होता. इम्रानने त्याला लाँग ऑनवर मेनलं. कपिल देवचा एक झेलही उडाला, परंतु तो खूपच लांब असल्यामुळे आपण पकडू शकलो नाही अशी आठवणही सचिननं सांगितली आहे. जर आपल्याला लाँगऑनच्या ऐवजी मिडऑनला ठेवलं असतं तर आपण कपिलचा झेल घेतला असता असं आपण एका मित्राला सांगितल्याचंही सचिननं म्हटलं आहे. अर्थात, हे इम्रानला आठवत असेल की नाही याची आपल्याला कल्पना नसल्याचंही सचिन तेंडुलकरने प्लेइंग इट माय वे या आत्मचरीत्रात नमूद केलं आहे.