Shocking : नेल आर्टसाठी 'या' सलूनमध्ये करण्यात येतोय जीवंत मुंग्यांचा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 17:36 IST2018-09-02T17:35:44+5:302018-09-02T17:36:02+5:30
महिला आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक उपाय करत असतात. कधी कधी तर आपल्या हटके फॅशनने सर्वांचं लेक्ष वेधून घेतात. फॅशन वर्ल्डमध्ये अनेक ट्रेन्ड धुमाकूळ घालत असतात. कधी कोणती फॅशन लोकं डोक्यावर घेतील हे सांगता येत नाही.

Shocking : नेल आर्टसाठी 'या' सलूनमध्ये करण्यात येतोय जीवंत मुंग्यांचा वापर!
महिला आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक उपाय करत असतात. कधी कधी तर आपल्या हटके फॅशनने सर्वांचं लेक्ष वेधून घेतात. फॅशन वर्ल्डमध्ये अनेक ट्रेन्ड धुमाकूळ घालत असतात. कधी कोणती फॅशन लोकं डोक्यावर घेतील हे सांगता येत नाही. सध्या असाच एक ट्रेन्ड एका सलूनने शोधून काढला आहे. सध्या महिलांमध्ये नेल आर्टचं क्रेझ फार वाढत आहे. चेहऱ्यासोबतच आपली नखं सुंदर बनवण्यासाठी महिला नेल आर्टचा पर्याय स्विकारतात.
सध्या रशियातील एका सलूनमध्ये एक विचित्र ट्रेन्ड सुरू झाला आहे. या सलूनमध्ये नेल आर्ट करताना अॅक्रॅलिकची ट्यूब तयार करून त्यामध्ये जीवंत मुंग्या सोडल्या जातात. ऐकून धक्का बसला ना? या सलूनचं नाव नेल सनी सलून असं आहे.
नेल सनी सलूनने जीवंत मुंग्या असलेल्या या नेल आर्टच्या डिझाइनचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक लोकं या नेल आर्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
एका यूजरने या सलूनला फैलावर घेत, 'ही कोणतीही नेला आर्ट डिजाइन नाही तर हा एक सजीव आहे. हे फार क्रूरपणाचं लक्षण आहे. त्या मुंग्या नखांमध्ये मरून जातील. या यूजरप्रमाणेच अनेकांनी हे आर्ट नसून क्रूरपणाचं लक्षण आहे.' असं म्हटलं आहे. तर काही लोकांनी या सलूनच्या बाजूने बोलत म्हटलं आहे की, 'या मुंग्या आहेत. किटक आणि प्राण्यांमध्ये फार फरक आहे. अनेक लोकं घरामध्ये मुंग्यांना मारून टाकतात.'
यूजर्सच्या प्रतिक्रियांचा भडिमार झाल्यानंतर या सलूनने काही वेळातच मुंग्यांना नखांमधून बाहेर काढतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.