Rose Day 2018 : कोट्यवधी रुपयांचं आहे हे गुलाब, जाणून घ्या आणखी काही अशाच गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 19:39 IST2018-02-07T19:12:42+5:302018-02-07T19:39:28+5:30
व्हेलेंटाईन वीकची बुधवारपासून (7 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीला 'रोज डे' सेलिब्रेट करण्यात येतो.

Rose Day 2018 : कोट्यवधी रुपयांचं आहे हे गुलाब, जाणून घ्या आणखी काही अशाच गोष्टी
नवी दिल्ली - व्हेलेंटाईन वीकची बुधवारपासून (7 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीला 'रोज डे' सेलिब्रेट करण्यात येतो. व्हेलेंटाईन वीकची सुरुवात गुलाबापासून केली जाते. या दिवशी आपल्या पार्टनरला गुलाब देऊन प्रेम व्यक्त केले जाते. जगभरात व्हेलेंटाईन वीक मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. काही देशांमध्ये व्हेलेंटाईन डेनिमित्त सार्वजनिक सुट्टीदेखील दिली जाते. 'रोज डे'ला लाल, पांढरे, गुलाबी, अन्य रंगांचे गुलाब दिले जातात. त्या-त्या रंगांचे गुलाब देण्यामागेही वेगवेगळे अर्थ असतात. गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जाते.
गुलाबासंबंधीची काहीशी निराळी माहिती आपण जाणून घेऊया.
- गुलाबांचे जवळपास 100 प्रकार आहेत. यामधील बहुतेक हे आशियामध्ये आढळून येतात, तर अन्य यूरोप, उत्तर अमेरिका आणि आफ्रिकेत आढळतात.
- ज्युलिएट गुलाब हे सर्वात महागडे गुलाब मानले जाते. कोट्यवधींच्या घरात या गुलाबाची किंमत आहे. गुलाबांच्या प्रजातींची पैदास करण्यात प्रसिद्ध असलेले फ्लॉव्हरिस्ट डेविड ऑस्टिन यांनी अनेक गुलाबांच्या सहाय्यानं ज्युलिएट गुलाबाची पैदास केली होती.
- व्यवसायाच्या उद्देशानं गुलाबांची करण्यात येत असलेल्या पैदासीमुळे हे फुल सहजपणे कोणत्याही देशात आढळू शकते. 13000 पद्धतींमध्ये गुलाबांची शेती करता येते.
- रानटी गुलाब हे कोणत्याही ठिकाणी जिवंत राहू शकते. मात्र हिवाळ्यात या जातीचे गुलाब अधिक काळ जगू शकत नाही.
- प्रत्येक रंगाचे गुलाब हे वेगवेगळ्या गोष्टीचे प्रतीक होते. लाल रंगाचे गुलाब प्रेमाचं प्रतीक आहे. पिवळ्या रंगाचे गुलाब मैत्रिचं प्रतीक आहे. नारंगी रंगाचे गुलाब उत्साहाचं, तर पांढ-या रंगाचे गुलाब पावित्र्याचं आणि गुलाबी रंगाचे गुलाब प्रसन्नतेचे प्रतीक आहे.
- परफ्यूमसाठी गुलाबाच्या तेलाचा वापर करण्यात येतो. एक ग्रॅम गुलाबाच्या तेलासाठी 2 हजार गुलाबांचा वापर करण्यात येतो.
- गुलाब पाणी आणि सिरपचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये करण्यात येतो.
- गुलाबावर आतापर्यंत अनेक गाणीदेखील चित्रित करण्यात आली आहेत.