शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

दुर्मीळ! फोटोग्राफरला दिसला पिवळा पेंग्विन; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'लय भारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 1:59 PM

Rare yellow penguin spotted by photographer: पिवळे पेंग्विन पाहून फोटोग्राफर भारावला; दक्षिण जॉर्जियातील बेटाजवळ दुर्मीळ पेंग्विनचं दर्शन

निसर्ग म्हणजे सर्वात मोठा जादूगार. तुम्ही निसर्गाच्या जितक्या जवळ जाल, तितका निसर्ग त्याच्या पोतडीतल्या एकापेक्षा एक सुंदर गोष्टी दाखवतो. निसर्गात नेमकं काय काय दडलंय, ते निसर्गाच्या कुशीत शिरल्याशिवाय समजत नाही. निसर्गाच्या जवळ गेल्यावर निसर्गाची अद्भुत किमया पाहायला मिळते. याचा अनुभव एका फोटोग्राफरनं घेतला आहे. निसर्गाचा चमत्कार पाहून फोटोग्राफर अक्षरश: भारावून गेला. त्यानं त्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Rare yellow penguin spotted by photographer)काळ्या-पांढऱ्या रंगांचे पेंग्विन तुम्ही अनेकदा पाहिले असतील. समुद्र किनारी फिरणारे शेकडो पेंग्विन म्हणजे जणू एकाच गणवेशातले विद्यार्थी दिसतात. पण तुम्ही कधी पिवळ्या रंगाचा पेंग्विन पाहिला आहे का? वाईल्ड लाईफ फोटोग्राफर इव्ह ऍडम यांनी दक्षिण जॉर्जियात २०१९ मध्ये पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पेंग्विनचा फोटो टिपला आहे. शुक्रवारी इन्स्टाग्रामवरून त्यांनी पिवळ्या पेंग्विनचा दुर्मीळ फोटो शेअर केला आहे.  'मला सुंदर किंग पेंग्विन पाहण्याची संधी मिळाली. त्या पेंग्विनचे फोटो मला टिपता आले. मला जणू काही निसर्गाची लॉटरी लागली,' अशा शब्दांत ऍडम यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'दक्षिण जॉर्जियात असलेल्या बेटाजवळील दुर्गम समुद्र किनाऱ्यावर आम्ही आमच्या रबर बोटी उघडत होतो. त्यावेळी किंग पेंग्विन आमच्या समोर आला. आसपास समुद्री हत्ती, अंटार्टिक सील यांची गर्दी असताना तो पेंग्विन आमच्या दिशेनं चालू लागला. माझ्यासारखा भाग्यवान मीच असं त्यावेळी मला वाटलं,' असं ऍडम यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.