राखी सावंतचा म्हाडातही ‘फ्लॉप शो’

By Admin | Updated: May 23, 2014 02:50 IST2014-05-23T02:45:48+5:302014-05-23T02:50:02+5:30

लोकसभा निवडणुकीमध्ये वादग्रस्त विधान करूनही डाळ शिजू न शकलेल्या ‘आयटम गर्ल’ राखी सावंतने गुरुवारी अकस्मात म्हाडाच्या कार्यालयात प्रवेश करून अधिकार्‍यांना भांबावून सोडले.

Rakhi Sawant's Mahadat also stars 'Flop Show' | राखी सावंतचा म्हाडातही ‘फ्लॉप शो’

राखी सावंतचा म्हाडातही ‘फ्लॉप शो’

जमीर काझी, मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये वादग्रस्त विधान करूनही डाळ शिजू न शकलेल्या ‘आयटम गर्ल’ राखी सावंतने गुरुवारी अकस्मात म्हाडाच्या कार्यालयात प्रवेश करून अधिकार्‍यांना भांबावून सोडले. म्हाडा घराच्या लॉटरीसाठी आपला अर्ज भरून देण्याचा हट्ट धरला. मात्र इच्छुक अर्जदारांनी स्वत: अर्ज भरावयाचा असून, सर्वांसाठी नियम सारखे असल्याचे सांगून तिची परतावणी करण्यात आली. सुरुवातीला आग्रह आणि त्यानंतर केलेल्या विनवणीला कोणी जुमानले नसल्याने तिचा कार्यालयातील सुमारे तासाभराचा शो निवडणुकीप्रमाणे ‘फ्लॉप’ ठरला. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास ती म्हाडाच्या वांद्रेतील प्रधान कार्यालयात गेली. मुंबई मंडळाचे सभापती युसूफ इब्राहिम यांच्या कक्षात जाऊन म्हाडासाठी अर्ज भरणार असल्याचे तिने सांगितले. राखीने युसूफ इब्राहिम यांच्यासह अन्य अधिकार्‍यांकडे मोबाइल नंबर मागितला. मात्र माहिती हेल्पलाइनवर उपलब्ध असल्याने त्यावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले. फारच हट्ट धरल्याने अखेर अपर्णा सोमाणी यांनी तिला आपला भ्रमणध्वनी दिला. सुमारे तासाभरानंतर काहीशा निराशेने राखी अखेर बाहेर पडली.

Web Title: Rakhi Sawant's Mahadat also stars 'Flop Show'