इंद्रधनुष्यी गाव सेमरेंग
By Admin | Updated: June 2, 2017 00:33 IST2017-06-02T00:33:13+5:302017-06-02T00:33:13+5:30
इंडोनेशियातील लहान गाव सेमरेंग सध्या इंटरनेटवर मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. कोणालाही या गावाबद्दल माहिती मिळावी, असे

इंद्रधनुष्यी गाव सेमरेंग
इंडोनेशियातील लहान गाव सेमरेंग सध्या इंटरनेटवर मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. कोणालाही या गावाबद्दल माहिती मिळावी, असे वाटते. गरिबीला तोंड देत असलेल्या या गावाचा झालेला कायापालट कोणालाही आश्चर्यचकीत करील. डोंगराळ भागात वसलेले हे गाव पर्यटकांचे आकर्षक केंद्र बनले आहे व त्याचे कारण आहे येथील रंगीबेरंगी घरे. गा गावात किमान २०० घरे असून सगळ्यांचे रंग वेगवेगळे आहेत व त्यामुळे गावाला इंद्रधनुष्याचे खेडे म्हटले जाते. सेमरेंग गावातील सोनोसारी समाजाने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी व उपजीविकेसाठी ही कल्पकता दाखवली आहे. गावातील सगळी घरे, भिंती आणि गल्ल्यांना रंगवण्यासाठी जवळपास एक महिना लागला. त्यानंतर घरांचे जे रूप बनले आहे ते बघून सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. समाजमाध्यमांवर या गावातील घरांची छायाचित्रे वेगाने व्हायरल झाली आहेत. विदेशातून पर्यटक ही घरे बघायला येत आहेत. तेथील सरकारसह अनेक कंपन्यांनी गावाचे रूप पालटण्यासाठी मदत केलेली आहे.