'प्यार इन बिहार', जावयाला सासूकडून हवा घटस्फोट

By Admin | Updated: August 17, 2016 12:18 IST2016-08-17T12:11:31+5:302016-08-17T12:18:44+5:30

काही महिन्यांपूर्वी एक आगळी-वेगळी प्रेमकहाणी बिहारमध्ये वर्तमानपत्रांची हेडलाईन बनली होती.

'Pyaar In Bihar', Javanese divorce divorce from sausage | 'प्यार इन बिहार', जावयाला सासूकडून हवा घटस्फोट

'प्यार इन बिहार', जावयाला सासूकडून हवा घटस्फोट

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. १७ - काही महिन्यांपूर्वी एक आगळी-वेगळी प्रेमकहाणी बिहारमध्ये वर्तमानपत्रांची हेडलाईन बनली होती. नात्याला कलंक लावणा-या या प्रेमकथेमध्ये सासू आणि जावयाने लग्न करुन संसार थाटला होता. पण आता या प्रेमकथेने नवे वळण घेतले आहे. 
 
बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात पुरैनी गावामध्यील २२ वर्षीय सूरज महतोने पत्नीचा विश्वास घात करुन सासू आशा देवीशी लग्नगाठ बांधली. पण अवघ्या काही महिन्यात सूरज आणि आशा देवीमध्ये खटके उडू लागले असून, सूरजने आशा देवीपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. 
 
आणखी वाचा 
 
सूरजला आता आपल्या चुकीची उपरती झाली आहे. अशा देवी बरोबर लग्न करुन मी चूक केली. आशा देवीला मी आता पत्नीसारखी वागणूक देत नाही. पूर्वपत्नी ललिताची समजूत घालून मी तिला पुन्हा माझ्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करणार आहे असे सूरजने सांगितले. 
 
आशा देवी आणि सूरज कोर्टात विवाह करुनघरी परतले तेव्हा समोरचे दृश्य बघून मुलगी चक्कर येऊन खाली कोसळली होती. सूरजलाच नाही तर, आशा देवीला सुद्धा आता उपरती झाली आहे. मी चूक केली. मी सूरजकडे आता जावयाच्या नजरेतून बघते असे तिने सांगितले. 
 

Web Title: 'Pyaar In Bihar', Javanese divorce divorce from sausage