शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

फुकट कुणालाही मिठी मारत नाही ही सुंदर महिला, एका प्रेमाच्या झप्पीची किंमत वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 16:17 IST

Professional Cuddler Woman : मिसी रॉबिनसन नावाची महिला हेच काम करते. ती एक प्रोफेशनल कडलर आहे. जी लोकांनी मिठी मारून त्यांची चिंता, तणाव दूर करते. त्यांनी प्रेमाचा आनंद देते.

Professional Cuddler Woman Charges 8000 Rupees: जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या असतात. काही लोकांची नोकरी फारच डिमांडिंट असते आणि यासाठी त्यांना भरपूर वेळही द्यावा लागतो. तर काही लोकांच्या नोकरी या वेगळ्या पद्धतीच्या असतात. ज्यात त्यांनी शारीरिक मेहनत कमी आणि भावना जास्त दाखवाव्या लागतात. एक अशीच नोकरी आहे प्रोफेशनल कडलर. ज्यात लोक प्रेम आणि शांतता मिळवण्यासाठी पैसे खर्च करतात.

आपल्या देशात प्रत्येक गोष्टीवर लोक एकमेकांना मिठी मारतात. आनंद असो वा दु:ख, एक झप्पी तर मिळतेच. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, परदेशात प्रेमाने मिठी मारण्याचेही पैसे द्यावे लागतात. मिसी रॉबिनसन नावाची महिला हेच काम करते. ती एक प्रोफेशनल कडलर आहे. जी लोकांनी मिठी मारून त्यांची चिंता, तणाव दूर करते. त्यांनी प्रेमाचा आनंद देते.

किती घेते ती पैसे?

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मिसी रॉबिनसन प्रोफेशनली कडलिंगचं काम करते आणि यासाठी तिने सेशन व त्यासाठी टायमिंगही ठरवला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी मिसी एकट्या आणि निराश लोकांना मिठी मारून त्यांचं दु:खं ऐकते व त्या बदल्यात पैसे घेते. तिचं एक सेशन सामान्यपणे 8 हजार रूपयांचं असतं. 43 वर्षीय मिसी गोल्ड कोस्टमध्ये राहते आणि क्लाइंटने सांगितलेल्या ठिकाणावर जाऊन ती त्यांना मिठी मारते. त्यांचं तणाव दूर करण्यास मदत करते. तिचं हे करिअर भलेही अजब असेल, पण 2010 पासून ती हे काम करत आहे.

कडल थेरपीची डिमांड

मिसीनुसार, जादूच्या झप्पीला कडल थेरपी म्हटलं जातं. तिला ही आयडिया एका टीव्ही शोमधून आली हती. ज्यात तिने प्रोफेशनल कडलरला पाहिलं होतं. ती याला मानसिक समस्यांनी हैराण लोकांसाठी एक समाज सेवा मानते. ती 99 पेक्षा जास्त कडलिंग पोजिशन सांगते, ज्या बेडपासून ते काउचवर वापरल्या जाऊ शकतात. 

ती सांगते की,  काही लोकांना तिच्या कामाबाबत गैरसमज होतात. पण ही केवळ मिठी मारून तणाव दूर करण्याची सेवा आहे. तिच्या क्लाएंटमध्ये जास्तकरून नोकरी करणारे आणि वृद्ध लोक असता. ज्यांना तणाव दूर करायचा असतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAustraliaआॅस्ट्रेलिया