मोबाईल चोरणा-या माकडाविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

By Admin | Updated: May 4, 2016 09:56 IST2016-05-04T09:56:58+5:302016-05-04T09:56:58+5:30

भोपाळमध्ये पार्वती बहरानी या महिलेने माकडाविरोधात मोबाईल फोन चोरी केल्याची तक्रार केली आहे

Police complaint against woman Chorana Maqda | मोबाईल चोरणा-या माकडाविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

मोबाईल चोरणा-या माकडाविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

>ऑनलाइन लोकमत - 
भोपाळ, दि. 04 - मोबाईल फोन चोरी होण्याच्या घटना ऐकायला मिळणं काही नवीन नाही. भोपाळमध्ये देखील एका महिलेने मोबाईल फोन चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही तक्रार कोणा चोराविरोधात नाही तर एका माकडाविरोधात केली आहे. पार्वती बहरानी असं या महिलेचं नाव आहे. 
 
'घरामध्ये काम करत असताना सकाळी 10 च्या सुमारास माकडाने माझा मोबाईल उचलून नेला. मी माकडाचा पाठलाग केला पण त्यांच्या रौद्ररुप पाहून घाबरले आणि मोबाईल तिथेच सोडून आले', असं पार्वती यांनी सांगितलं आहे. 'मोबाईल घेऊन पळ काढण्याआधी हे माकड खुप वेळ घराभोवती फिरत होते. मी पाठलाग केला पण तो व्यर्थ गेला', अशी माहिती पार्वती यांनी पोलिसांना दिली आहे. 
 
पार्वती राहत असलेल्या परिसरात माकडांनी लोकांवर हल्ले करणे नेहमीचंच झालं आहे. आम्ही अजून गुन्हा दाखल करुन घेतलेली नाही पण तपास करत आहोत अशी माहिती कोटावली पोलीस ठाण्याचे अधिकारी कमलेंद्र सिंग यांनी सांगितलं आहे.
 

Web Title: Police complaint against woman Chorana Maqda