फिलीपीन्सचे राष्ट्रपतीन रोड्रिगो दुतेर्ते पुन्हा एकदा महिलांना किस करण्यावरून चर्चेत आले आहेत. गेल्यावर्षी दक्षिण कोरियामध्ये त्यांनी एका विवाहित महिलेला ओठांवर किस केल्याने मोठं वादळ उठलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांचं नवं किस पुराण चर्चेत आलं आहे.
७४ वर्षीय राष्ट्रपती रोड्रिगो नुकतेच जपान दौऱ्यावर होते. इथे त्यांनी फिलीपीन समुदायाच्या लोकांची भेट घेतली आणि त्यांच्यांशी संवाद साधला. भाषणांतर त्यांनी स्टेरसमोर बसलेल्या एका महिलेला त्यांना किस करण्यासाठी स्टेजवर बोलले. हा नजारा पाहून समोर असलेले लोक आणि प्रसारमाध्यमाचे लोक हैराण झाले.
सीएनएन फिलीपीन्सच्या एका रिपोर्टनुसार, स्टेजवर बोलवलेली महिला आधी तर थोडी लाजली. पण नंतर ती किस करण्यासाठी तयार झाली. तिने राष्ट्रपतींना विचारलं की, कुठे किस करायचं आहे? ओठांवर की गालावर? त्यानंतर महिलेने त्यांच्या गालाला गाल लावून किस केलं. हे करत असताना राष्ट्रपतींनी दोनदा तिला ओठांवर किस कर असं खुणावलं देखील.
याचप्रकारे आणखी चार महिलांनी स्टेजवर येऊन राष्ट्रपतींच्या गालावर किस केलं. त्यानंतर त्यांनी सर्व महिलांचे आभार मानले. हे सगळं सुरू असताना त्यांची अनेक वर्षांपासूनची साथीदार हनीलेट एवेंसिना देखील स्टेजवर होती.
राष्ट्रपती रोड्रिगो यांनी भाषणादरम्यान सांगितलं की, ते त्यांची घटस्फोटीत पत्नी एलिजाबेथ जिमरमॅनला भेटण्याआधी समलैंगिक होते. म्हणजे त्यांना आधी पुरूष आवडायचे. पण नंतर त्यांनी हळूहळू स्वत:ला सावरत यातून बाहेर काढलं.