Trending Video of Beggar girl : तुमच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल असे अनेकदा म्हटले जाते. काही लोकांना यामागचा अर्थ कळत नाही आणि काही लोक अनोख्या मार्गाने पैसे कमविण्याचा विचार करतात. पैसा कमावता येत नसेल तर दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते किंवा रस्त्यावर भीक मागून जगावे लागते. 'भीक मागणे' हे ऐकूनच लोक आश्चर्यचकित होतात. तसेच, आम्ही जर तुम्हाला सांगितले की एका मुलीने भीक मागून आपली मालमत्ता बनवली आहे तर काय म्हणाल? मलेशियामध्ये भीक मागून ती श्रीमंत झाल्याचा दावा एका पाकिस्तानी मुलीने व्हिडिओमध्ये केला आहे.
पाकिस्तानातील एका मुलीने तिच्या प्रोफेशनबद्दल खुलेपणाने बोलून नेटिझन्सचे संपूर्ण लक्ष वेधून घेतले आहे. परदेशात फ्लॅट, कार आणि मालमत्ता असलेल्या भिकाऱ्याबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? हे तुम्हाला थोडंसं अजब वाटेल, पण पाकिस्तानातील लायबा नावाच्या मुलीने असाच दावा केला आहे. तिने सांगितले की, मलेशियामध्ये ती फक्त भीक मागून श्रीमंत झाली. एवढेच नाही तर तिने परदेशात एक प्रॉपर्टी बनवली आहे आणि ती तिची मालकही आहे. इंटरनेटवर समोर आलेल्या एका मुलाखतीत लैबाने आपल्याजवळ इतकी संपत्ती कशी आली हे सांगितले.
मुलाखतीत ती म्हणाली, “जेव्हाही मला वेळ मिळेल तेव्हा मी अनेकदा पाकिस्तानात येते. मी सध्या मलेशियामध्ये राहते आणि माझ्याकडे दोन फ्लॅट, कार आणि माझा व्यवसाय आहे." जेव्हा पत्रकाराने लैबाला विचारले की ती इतकी श्रीमंत कशी झाली, तेव्हा लायबाने उत्तर दिले की 'भीक मागून'! ती असे देखील म्हणाली की, 'मला नेहमीच श्रीमंत व्हायचे होते पण मग मी भीक मागू लागले. मी ट्रॅफिक चौकात उभं राहून भीक मागू लागले. पम त्यातून सध्या मी मलेशियामध्ये एक अद्भुत जीवन जगत आहे.